Marathi News> मनोरंजन
Advertisement

आर्यन कारागृहातून बाहेर आल्यानंतर चार महिन्यांनी शाहरुखचा लक्षवेधी निर्णय 

 शाहरुख खानने तब्बल चार महिन्यांच्या मोठ्या विश्रांतीनंतर उचललं मोठं पाऊल

आर्यन कारागृहातून बाहेर आल्यानंतर चार महिन्यांनी शाहरुखचा लक्षवेधी निर्णय 

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान तब्बल चार महिन्यांच्या मोठ्या विश्रांतीनंतर अखेर इन्स्टाग्रामवर परतला आहे. इंस्टाग्रामवर एका जाहिरातीच्या व्हिडिओद्वारे त्याने सोशल मीडियावर पुनरागमन केलं आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुखसोबत त्याची पत्नी गौरी खानही दिसत आहे.

मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर शाहरुखने त्याच्या सोशल मीडियापासून स्वतःला दूर केलं होतं. मात्र, आता आर्यन जामिनावर जेलबाहेर आहे. या प्रकरणांनंतर शाहरुखने पहिल्यांदाच आपल्या सोशल मीडिया हँडलवर काही पोस्ट शेअर केली आहे. किंग खानची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. इंस्टाग्रामवर अभिनेत्याच्या पुनरागमनामुळे चाहते खूप खूश होत आहेत.

व्हिडिओत पत्नी गौरीसोबत दिसतोय किंग खान
व्हिडिओ शेअर करत, शाहरुख खान कॅप्शनमध्ये लिहिलंय, कला आणि तंत्रज्ञानाचा असा मिलाफ असलेलं उत्पादन तुम्हाला फार क्वचितच पाहायला मिळतं. जाहिरातीच्या व्हिडिओच्या सुरुवातीला शाहरुखची एंट्री एका आलिशान कारमधून होते.त्यानंतर तो मोठ्या बंगल्यात पोहोचतो. यानंतर शाहरुख सोफ्यावर बसलेल्या टीव्हीकडे इशारा करतो आणि त्यानंतर गौरी खानची एन्ट्री होते. व्हिडिओमध्ये दोघंही खूप क्यूट दिसत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फॅन्सच्या रिएक्शन 
शाहरुखची ही पोस्ट शेअर करताच व्हायरल झाली. काही मिनिटांतच त्यांच्या पोस्टला 7 लाख 85 हजारांहून अधिक लोकांनी प्रतिसाद दिला आहे. यासोबतच चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये 'किंग इज बॅक' अशी कमेंट करून अभिनेत्याचं स्वागत केलं आहे. तर दुसऱ्याने लिहिलं, "शेवटी तुम्ही परत आलात" तर एका यूजरने म्हटलंय की,  "इतक्या दिवसांनी शाहरुखची पोस्ट पाहून आनंद झाला. वाटलं...love srk always Other यावरून एका यूजरनं ट्रोल केलं आणि लिहिलं, शेवटी खानसाहबला आयडीचा पासवर्ड आठवला.

Read More