Marathi News> मनोरंजन
Advertisement

शाहिद कपूरच्या पत्नीच्या शरीरावर चढले भयानक किडे!

 अलीकडेच मिरा राजपूतने स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, 

शाहिद कपूरच्या पत्नीच्या शरीरावर चढले भयानक किडे!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची फॅन फॉलोविंग मोठी आहेच. मात्र त्याची पत्नी मीरा राजपूतही याबाबतीत कमी नाही. सोशल मीडियावर लोकं तिला खूप फॉलो करतात. मीरा राजपूत अनेकदा जाहिरातीतही दिसते. इतकंच नाही तर ती अनेक फोटोशूटचा भाग आहे. अलीकडेच तिने स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती काहीतरी विचित्र करताना दिसत आहे. 

चेहऱ्यावर किडे
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडिया स्टार आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. मीरा देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. 14 नोव्हेंबर रोजी बालदिनाच्या निमित्ताने मीरा राजपूतने एक मजेदार व्हिडिओ अपलोड केला आहे. जरी त्यांचा मुलगा झैन कपूरला ते आवडलं नाही. व्हिडिओमध्ये मीरा राजपूतच्या चेहऱ्यावर किडे रेंगाळताना दिसतायेत.

मुलाला मजेदार वाटलं नाही
वास्तविक मीरा राजपूतने इंस्टाग्रामवर एक फिल्टर वापरलं, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आधी झुरळ दिसतं आणि नंतर एक कोळी तिच्या चेहऱ्यावर रेंगाळतो. व्हिडिओमध्ये मीरा एक विचित्र चेहरा बनवते. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की,  'हॅपी चिल्ड्रन्स डे, माझ्या मुलाने मला सांगितलं की मी त्याला त्रास देत आहे. आणि हे त्याला अजिबात मजेदार वाटलं नाही. मला वाटलं की मी या बाबतीत बाबांच्या विनोदाच्या बरोबरीची आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बॉलीवूडची लोकप्रिय जोडी
मीरा आणि शाहिदने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली होती. दिल्लीतील एका कॉमन फ्रेंडच्या फार्महाऊसवर दोघांची भेट झाली. मीरा आणि शाहिदच्या लग्नात कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत भव्य रिसेप्शन आयोजित केलं होतं. या दोघांना एक मुलगी मीशा आणि एक मुलगा झैन आहे.

Read More