Marathi News> मनोरंजन
Advertisement

KIFF Video: बडे दिल वाला! शाहरूखने सेकंदाच जिंकलं मन, अमिताभ बच्चन दिसताच केलं असं काही की...

Shah Rukh Khan Touches Amitabh Bachchan Feet: कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (KIFF) उद्घाटन कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. शाहरुखने अमिताभ बच्चन यांना पाहिलं अन्...

KIFF Video: बडे दिल वाला! शाहरूखने सेकंदाच जिंकलं मन, अमिताभ बच्चन दिसताच केलं असं काही की...

Shah Rukh Khan, Amitabh Bachchan: 'कभी खुशी कभी गम' चित्रपटात मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि बॉलिवूडचा किंग शाहरूख खान (Shah Rukh Khan) यांनी एकत्र काम केलं. ते दोघेही एकमेकांच्या कामाचे कौतूक करतात. दोघांमध्ये खूप छान बाँडिंग देखील आहे. बिग बी (Big B) अनेकदा शाहरुखची स्तुती करताना दिसत असतात पण त्याहूनही ते त्याला वेळोवेळी अनेक महत्त्वाचे सल्ले आणि सूचनाही देतात. या दोघांची बॉडिंग पुन्हा एकदा पहायला मिळाली आहे. (Shah Rukh Khan Touches Amitabh Bachchan Feet At Film Festival In Kolkata Watch video marathi news)

कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (KIFF) उद्घाटन कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी अमिताभ बच्चन यांनी नागरी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषयावर विशेष भाष्य केलं केलं. तर शाहरूखने देखील ट्रोलर्सचं तोंडसूख घेतलं. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख अमिताभ बच्चन यांना पाहताच त्यांच्या पाया पडला (shah rukh khan touches amitabh bachchan). तर जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या पायाला स्पर्श केला. अमिताभ बच्चन शाहरुखच्या पायाला स्पर्श केल्यानंतर शाहरूखने बच्चन यांना मिठी मारली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Shah rukh khan Video) होताना दिसत आहे.

पाहा Video -

दरम्यान, या कार्यक्रमात अमिताभ बच्चन आणि जया यांच्यासोबत त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनही (Abhishekh Bachchan) उपस्थित होता. त्यांची अभिनेत्री राणी मुखर्जी, गायक अरिजित सिंग आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र, सध्या शाहरूख आणि अमिताभ यांच्या केमेस्ट्रीची चर्चा होताना दिसत आहे.

Read More