Marathi News> मनोरंजन
Advertisement

शाहरुख खानचा 'जवान' पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणाऱ्या चाहत्यांसाठी मिळणार भेट वस्तू!

Shah Rukh Khan's Special Gift for Fans : शाहरुख खान 'जवान' हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणाऱ्या चाहत्यांना देणार खास गिफ्ट... सोशल मीडियावर केला खुलासा

शाहरुख खानचा 'जवान' पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणाऱ्या चाहत्यांसाठी मिळणार भेट वस्तू!

Shah Rukh Khan's Special Gift for Fans : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान हा सध्या त्याच्या जवान या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला सुरुवात झाली आहे. या सगळ्यात शाहरुखनं त्याच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर संवाद साधला. यावेळी शाहरुखनं या गोष्टीचा खुलासा केला की त्याचे जे चाहते जवान पाहायला जातिल त्या सगळ्यांना एक भेट वस्तू मिळणार आहे. 

शाहरुखनं ट्विटरवर त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यानंतर पुन्हा एकदा #AskSRK हे हॅशटॅग ट्रेन्ड होऊ लागलं.  त्यानंतर शाहरुख खानला एका चाहत्यानं जवान या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या त्याच्या मास्कविषयी प्रश्न विचारला. त्या बदल्यात शाहरुखनं त्याच्या चाहत्याला एक भेट दिली. शाहरुख जी भेट देणार आहेत ते जाणून त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. शाहरुख खानला या चाहत्यानं प्रश्न विचारला की सर हा मास्क कुठे मिळेल. कृपया आम्हाला सांगा. यावर उत्तर देत शाहरुखनं कमेंट केली की मी सांगेन, माझी मार्केटिंग टीम हे मास्क बनवेल आणि चित्रपट पाहायला जाणाऱ्यांना नक्कीच देईल. खूप चांगली आयड्या दिली आहे. धन्यवाद #Jawan

शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी फक्त जवान नाही तर त्याच्या खासगी आयुष्यासंबंधीत अनेक प्रश्न विचारले. एक नेटकरी म्हणाला, 'सर माझ्या पत्नीसोबत मी तुमचा जवान चित्रपट पाहायला जाण्याचा प्लॅन केला आहे, पण प्रत्येकवेळी ती उशीर करते, पठाणच्या वेळी देखील तिनं उशिर केला होता. काही टिप्स द्या... की आम्ही वेळेवर पोहोचू आणि जवान पाहू शकू.' त्यावर उत्तर देत शाहरुख खान म्हणाली की 'मित्रांनो आता पत्नी संबंधित असलेल्या अडचणी किंवा प्रश्न विचारू नका. माझी विनंती आहे. माझ्याकडून माझ्याच समस्या सांभाळल्या जात नाही, तुम्ही तुमच्या समस्या देखील माझ्याच डोक्यावर टाकतात, सगळ्या पत्नींसाठी एकच सुचना... कृपया कोणत्याही गोष्टीची चिंता न करता जवान पाहण्यास जा.'

हेही वाचा : बाबोss! 63 व्या वर्षी डीपनेक गाऊनमध्ये संगीता बिजलानीचा Bold Look

जवान विषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपति, प्रियामणि, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं बजेट हे 300 कोटी रुपये आहे.

Read More