Marathi News> मनोरंजन
Advertisement

Honey Singh On Shah Rukh Khan: "मी शाहरूख खानला स्पष्टच सांगितलं...", लुंगी डान्स गाण्यावर हनी सिंहचा खुलासा!

Honey Singh On Shah Rukh Khan: शाहरुख खानला लुंगी डान्स गाणं अजिबात आवडत नसल्याचा खुलासा हनी सिंग याने केला आहे. जर गाणं नको असेल तर मी ते सिंगल म्हणून रिलीज करेन, असं हनी सिंह किंग खानला सांगितलं होतं.

Honey Singh On Shah Rukh Khan:

Honey Singh Shah Rukh Khan Lungi Dance: बॉलिवूडचा किंग खान (Shah Rukh Khan) अशी ओळख असलेल्या शाहरूख खानने आजपर्यंत प्रेक्षकांना एकाहून एक अनेक चित्रपट दिले आहेत. तरुणाईच्या गळ्यातील ताईट म्हणजे शाहरूख खान. 2013 मध्ये आलेल्या चेन्नई एक्सप्रेस (Chennai Express) या सिनेमामुळे शाहरूखची फॅन फॉलोविंग आणखीन वाढली. या चित्रपटातील लुंगी डान्स गाणं (Lungi Dance) चांगलंच गाजलं. त्यावर आता प्रसिद्ध पंजाबी गायक हनी सिंह (Honey Singh) याने मोठं वक्तव्य केलंय.

शाहरुख खान आणि यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) यांनी चेन्नई एक्सप्रेसमधील लुंगी डान्स या गाण्यावर एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट सुपरहिट होण्यामागे हे गाणंही मोठं कारण ठरलं होतं. या गाण्यात शाहरुख खान आणि हनी सिंह लुंगी घालून नाचताना दिसला होता. यावर आता एका मुलाखतीत हनी सिंह याने अॅक्टर शाहरूख खानची पोलखोल केली आहे.

काय म्हणाला Honey Singh?

जेव्हा शाहरुखनं (Shah Rukh Khan) हे गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा त्याला ते आवडलं नव्हतं, असं हनी सिंह म्हणाला. शाहरुख खानने मला इंग्लिश बीटसारखे गाणे बनवायला सांगितलं. तुमच्या चित्रपटाचा माहोल काय आहे? असा प्रश्न विचारल्यावर, त्यांनी 3 तास चित्रपटाची कथा सांगितली. मी काहीतरी बनवून आणतो, असं उत्तर मी त्यांना दिलं. त्यावेळी मी लुंगी डान्स गाणं (Shah rukh honey singh lungi dance) तयार करून आणलं, असं हनी सिंह म्हणतो.

लुंगी डान्स गाणं मला समजलं नसल्याचं शाहरूखने सांगितलं. मी म्हणालो की तुम्हाला हे गाणं हवं असेल तर ठीक आहे आणि जर तुम्हाला ते नको असेल तर मी ते सिंगल म्हणून रिलीज करेन आणि हे गाणे चालेल, असा विश्वास मी व्यक्त केला होता, असंही हनी सिंह सांगतो.

आणखी वाचा - Sayali Sanjeev: सायली संजीव होणार नाशिकची आमदार? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली...

दरम्यान, गाणं रिलीज झालं आणि सर्वांना हे गाणं आवडलं. हे गाणं शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. फक्त साऊथ इंडियामध्येच नाही तर देशभर या गाण्याची चर्चा झाली होती.

Read More