Marathi News> मनोरंजन
Advertisement

शाहरुख खानने तोडली जुनी परंपरा, किंग खानच्या या निर्णयावर चाहते नाराज

नुकताच 2 नोव्हेंबरला बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खानने वाढदिवस साजरा केला.

शाहरुख खानने तोडली जुनी परंपरा, किंग खानच्या या निर्णयावर चाहते नाराज

मुंबई  : नुकताच 2 नोव्हेंबरला बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खानने वाढदिवस साजरा केला. बर्थडेच्या दिवशी शाहरुची एक झलक पहाण्यासाठी त्याचे हजारो चाहते उत्सुक होते. मात्र 2 तारखेची रात्र गेली तरी शाहरुख त्याच्या बाल्कनीमध्ये आला नाही. दरवेळी प्रमाणे शाहरुख यावर्षी मात्र त्याच्या टेरेस किंवा बाल्कनीमध्ये दिसला नाही. 

शाहरुख खानने 56व्या वाढदिवसादिवशी तोडली जुनी परंपरा
2 नोव्हेंबरच्या अर्ध्या रात्री पर्यंत त्याचे फॅन्स मन्नतच्या बाहेर उभे होते. मात्र तो बाहेर आलाच नाही. आणि आपल्या फॅन्सला भेटलाच नाही. शाहरुख खानने ना कोणती सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली ना ही, कुठे तो काल स्पॉट झाला. शाहरुखने आपली 56व्या वाढदिवसादिवशीची परंपरा तोडली. 

दरवर्षी शाहरुख मन्नतच्या बाल्कनीमध्ये टेरेसवर जावून अभिवादन करायचा. मात्र यावेळी शाहरुखचे फॅन्स त्याच्या न येण्यावर निराश झाले. मन्नतच्या बाहेर पापाराझी देखील जमा झाले होते. शाहरुख खानने आपला 56व्या वाढदिवसादिवशी पार्टीदेखील केली नाही. 

मागच्या काही दिवसांत किंग खान आणि त्याचं संपूर्ण कुटुंब ज्या परिस्थितीमधून गेले आहेत.  याला पाहून निर्णय घेण्यात आला होता की, शाहरुख आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करणार नाही.  किंग खानचा मुलगा आर्यन खान 28 दिवस जेलमध्ये होता ड्रग्ज केसमध्ये फसल्यामुळे एनसीबीने आर्यनला अटक केलं. तीनवेळा आर्यनची बेल रिजेक्ट झाल्यानंतर त्याला बेल मिळाली. शाहरुख आणि त्याचा परिवार या दरम्यान बराच तणावात होते.    

Read More