Marathi News> मनोरंजन
Advertisement

खरचं अक्षय सात वर्ष कॅनडाला गेला की नाही, काय आहे तथ्य

खिलाडी अभिनेता अक्षय कुमारच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे.

खरचं अक्षय सात वर्ष कॅनडाला गेला की नाही, काय आहे तथ्य

मुंबई : खिलाडी अभिनेता अक्षय कुमारच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वाचा वाद काही केल्या शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी अक्षयने गेले सात वर्ष कॅनडाला गेलो नसल्याचे वक्तव्य केले होते. पण सोशन मीडियावर त्याचा हा दावा खोटा ठरवण्यात आला आहे. एका युजरने हा दाव खोटा असल्याचं म्हटलं आहे.  त्यासोबतच त्याने दोन स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. 

'मी माझ्या नागरिकत्वाबद्दल कधीही काहीही लपवण्याचा प्रयत्न केला नाही. गेल्या सात वर्षांपासून मी कॅनडाला गेलेलो नाही. मी भारतातच राहतो आणि कायदेशीररित्या करही  भरतो. भारताला आणखीन मजबूत बनवण्यावर माझा विश्वास आहे' असं अक्षयनं म्हटलं होतं. 

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले आहे.  देशभक्तीवर कायम बोलणाऱ्या अक्षयने लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये मतदान का केलं नाही, असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्याला विचारला होता. त्यानंतर अक्षयने या मागचं कारणदेखील सांगितलं होतं.  

कामाच्या बाबतीत बोलायचं तर अक्षय कुमार लवकरच दाक्षिणात्य सुपरहिट फिल्म 'कंचना'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि कियारा आडवानीही त्याच्यासोबत असतील. 'कंचना'च्या हिंदी रिमेकचं नाव 'लक्ष्मी बॉम्ब' ठेवण्यात आलंय. 'कंचना' हा सिनेमा राघव लॉरेन्स यांनी दिग्दर्शित केला होता. 

Read More