Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : सरकारवर टीका केल्यामुळे पालेकरांचं भाषण रोखलं आणि....

पालेकरांनाही ही बाब खटकली.   

VIDEO : सरकारवर टीका केल्यामुळे पालेकरांचं भाषण रोखलं आणि....

मुंबई : विविध विषयांवर आपली मतं अगदी खुलेपणाने मांडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांना एका वेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रीय अधुनिक कला संग्रहालय अर्थात नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA)मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी ते भाषण करत असतानाच त्यांना थांबवण्यात आलं आणि पालेकरांनाही ही बाब खटकली. 

'इनसाईड द एम्प्टी बॉक्स' या मुद्द्यावर ते बोलत होते. चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं असून, याच कार्य्करमात पालेकरांना त्यांची भूमिका मांडण्यापासून रोखण्यात आलं. यावेळी त्यांचं भाषण सुरु असतानाच त्यांनी राष्ट्रीय अधुनिक कला संग्रहलायासंदर्भात सरकारच्या हस्तक्षेपाबद्दल वक्तव्य करण्यास सुरुवात केली. पण, व्यासपीठावर उपस्थितांपैकीच काहींनी मध्येच थांबवत तुम्ही फक्त प्रभाकर बर्वेंबदद्ल बोला असा सल्ला त्यांना देण्यात आला. 

सरकारच्या भूमिकेवर या कार्यक्रमात टीका करु नका असं त्यांना बजावण्यात आलं. आपल्या भाषणात वारंवार होणारी ही अडवणूक पाहून अखेर पालेकरांनाही ही बाब खटकली आणि त्यांनी पुढे काहीही न बोलणं योग्य समजत थेट आसनावर येऊन बसण्यास प्राधान्य दिलं. सोशल मीडियावर पालेकरांच्या भाषणाचा व्हिड़िओ सध्या व्हायरल होत असून, त्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत. एखाद्या कार्यक्रमात भाषण करत असताना कोणा व्यक्तीला असं थांबवण्यात येतं का? हाच प्रश्न उपस्थित करत त्यांच्याकडून झाल्या प्रकारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

Read More