Marathi News> मनोरंजन
Advertisement

उर्वशी रौतेलाचा Airport Look पाहून नेटकरी भडकले, अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.  

उर्वशी रौतेलाचा Airport Look पाहून नेटकरी भडकले, अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.  बऱ्याच दिवसांपासून उर्वशी कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. उर्वशी ही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अनेकवेळा तिच्या फॅशनमुळे उर्वशी चर्चेत असते. नुकताच उर्वशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उर्वशीची फॅशन पाहून नेटकऱ्यांचे डोळे फिरले आहेत. 

उर्वशीचा हा व्हिडीओ फिल्मीग्यान या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत ती मुंबई एअरपोर्टवर असल्याचं दिसतयं. उर्वशीने गुलाबी रंगाचं टी-शर्ट आणि ब्लू रिबड जीन्स परिधान केली आहे. पण तिच्या जीन्सची स्टाईल फारच वेगळी आहे. उर्वशीचे मोकळे केस सोडले आहेत. मागच्या बाजुनेही जीन्स रिब्ड असल्याचे नेटकऱ्यांच्या काही पसंतीस उतरले नाही. उर्वशीच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेन्ट्स केल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्वशीच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'इस्त्री करताना जीन्स फाटली का खरं सांग.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आता ही काय नवीन फॅशन आहे का?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'जीन्स उलटी परिधान केलीस.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'नशीब वर नीट परिधान केलं आहेस.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आमच्या इथे अशी पॅन्ट घातली तर कुत्रे मागे लागतील', अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान बॉलिवूडमध्ये फार कमी काळात उर्वशीनं स्वतःची वेगळी जागा तयार केली आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजचं दिग्दर्शन नीरज पाठक करत आहे. याशिवाय उर्वशीकडे काही आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टही आहेत.

fallbacks

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उर्वशी आणि जय पवारचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमुळे ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण ही ते दोघं दुबईच्या बुर्ज-अल-अरब येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा त्यांची भेट झाली होती. त्यानंतर हे दोघे रिलेशनशिपमध्ये नाही हे स्पष्ट झालं होतं. 

Read More