Marathi News> मनोरंजन
Advertisement

Trailer : मैत्रीच्या अतुट बंधनात अडकलेला ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’

येत्या १७ एप्रिलपासून हा नवीन सिझन अॅमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Trailer : मैत्रीच्या अतुट बंधनात अडकलेला ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’

मुंबई : 'वीरे दी वेडिंग' चित्रपटानंतर ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ही वेबसीरिज चाहत्यांच्या पसंतीस पडली. आता आपलं आयुष्या आपल्या मर्जीचे जगणाऱ्या चार तरुणींच्या जीवना भोवती सीरिजचं नवं  सिझन फिरताना दिसणार आहे. दुसऱ्या सिझनमध्ये इस्तांबूल शहरात त्या चार मैत्रिणींची पुन्हा भेट कशी होते, ते दाखवण्यात येणार आहे. पत्रकार, वकील, जिम प्रशिक्षक आणि श्रीमंताघरची लेक अशा भूमिका सीरिजमध्ये रंग भरणार आहेत. येत्या १७ एप्रिलपासून हा नवीन सिझन अॅमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

तरुणींच्या जीवनावर आधारित ही सीरिज शहरी भागात राहणाऱ्या महिलांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, समाजात असणाऱ्या रुढी, परंपरा, पुरुष प्रधान संस्कृती, घरच्यांकडून प्रत्येक गोष्टीसाठी होत असलेला विरोध, लादण्यात येणारे निर्बंध, अटी अशा अनेक गोष्टींचा सामना करत आनंदाने आपले जीवन जगणाऱ्या चौघींच्या आयुष्याच्या प्रवासाचा उत्तम दाखला आहे.

सयानी गुप्ता, किर्ती कुल्हारी, बानी जे, मानवी गगरू, लिसा रे, प्रतिक बब्बर, मिलिंद सोमण आणि इतर कलाकारांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नुपुर अस्थानाने या सिझनचं दिग्दर्शन केलं आहे.

Read More