Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉक्स ऑफिसवर 'टायगर जिंदा है'ची धमाल

सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर टायगर जिंदा है हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा हिट ठरतोय.

बॉक्स ऑफिसवर 'टायगर जिंदा है'ची धमाल

मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर टायगर जिंदा है हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा हिट ठरतोय.

या सिनेमाने अवघ्या दोन दिवसांतच ७० कोटी रुपयांची कमाई केलीये. टायगर जिंदा है या सिनेमाने पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अनुक्रमे ३४.१० कोटी आणि ३५.३० कोटी रुपये कमावले.

पहिल्या दोन दिवसांतच सलमान खानच्या सिनेमाने ६९.४० कोटी रुपये कमावलेत. दरम्यान, हा कमाईचा आकडा केवळ भारतातीलच असून अद्याप जगभरातील कमाईचा आकडा येणे बाकी आहे. 

सलमान खानच्या सिनेमाने भारताबाहेरही चांगली सुरुवात केली. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शच्या मते युकेमध्ये पहिल्या दोन दिवसांत या सिनेमाने २.७ कोटी रुपये कमावले. तर ऑस्ट्रेलियामध्ये १.९६ कोटी रुपये आणि न्यूझीलंडमध्ये ८०.१२ लाख रुपयांची कमाई केली. 

Read More