Marathi News> मनोरंजन
Advertisement

गोव्यात सारा तेंडुलकर लुटतेय सुट्ट्यांचा आनंद, फोटो व्हायरल

साराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल ...  

गोव्यात सारा तेंडुलकर लुटतेय सुट्ट्यांचा आनंद, फोटो व्हायरल

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिने मॉडेलिंग जगतात एन्ट्री केली आहे.   इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच साराने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले आहे. साराचे इन्स्टाग्रामवर 1.6 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. साराप्रमाणेच अनेक स्पोर्ट्स स्टार्सची मुलं आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत प्रवेश केला आहे. सारा अद्याप अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक चाहत्याची  इच्छा असते. 

सध्या सारा गोव्यात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. तिने काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये सारा फिरताना दिसत आहे. तिचे गोव्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. एका चाहत्याने तर सारा कमेंटमध्ये 'परी दिसत आहेस..' असं लिहिलं आहे. फोटोमध्ये ती अत्यंत साधी आणि सुंदर दिसत आहे. 

एवढंच नाही तर, सारा तेंडुलकरने नुकतेच मॉडेलिंग करिअर सुरू केले आहे. आता तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. पण तिने अद्याप बॉलिवूड पदार्पणाबाबत माहिती दिलेली नाही.

Read More