Marathi News> मनोरंजन
Advertisement

सारा स्वत:ची तुलना सदाबहार रेखा यांच्याशी करते तेव्हा...

'रेखा जी से है सारा बहुत सस्ती'  

सारा स्वत:ची तुलना सदाबहार रेखा यांच्याशी करते तेव्हा...

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान सोशन मीडियावर कायम फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांच्या देखील पसंतीस पडतात. आता साराने स्वत:चा एक क्लासीक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये तिने स्वत:ची तुलना सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्याशी केली. शिवाय या फोटोला क्लासिक असं कॅप्शन देखील दिलं आहे. तिने हे कॅप्शन बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांना समर्पित केलंय. 

“इन आंखों की मस्ती, रेखा जी से है सारा बहुत सस्ती, लकीली वो अपने आप में है हस्ती, वह खुद ही यह सारी बातें है करती और वो फस्ती…” अशी शायरी तिने रेखा यांच्यासाठी केली. तर तिच्या पोस्टवर अभिनेता वरून धवनने प्रतिक्रिया दिली आहे.

तर वरूनने तिच्या पोस्टवर खिल्ली उडवली आहे. 'तुझ्याकडे फार रिकामा वेळ आहे.' अशा आशयाची प्रतिक्रिया वरुणने दिली. सध्या वरूण आणि आलिया त्यांच्या आगामी 'कुली नं १' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. 

अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर स्टारर 'कुली नं. १' या १९९५ साली आलेल्या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांवर आहे. त्यानंतर आता पुन्हा 'कुली नं. १'चा रिमेक करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 'कुली नं. १'च्या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Read More