Marathi News> मनोरंजन
Advertisement

SaraAliKhan : काय होतीस तू ,काय झालीस तू...सारा तुस्सी ग्रेट हो

SaraAliKhan : अश्या आजारात वजनवाढीवर तुमचा कंट्रोल नसतो, मात्र तरीही तिने जिद्द आणि चिकाटीने आपलं वजन कमी करून दाखवलं. साराने मनाशी ठरवलं आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला

SaraAliKhan : काय होतीस तू ,काय झालीस तू...सारा तुस्सी ग्रेट हो

SaraAliKhan : सारा अली खान हिने अगदी कमी वेळात आपल्या अभिनयाने आणि मुख्यतः सध्या राहणीमान आणि बिनधास्त ऍटिट्यूडमुळे कमी काळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.  

अभिनेत्री सारा अली खानने (sara ali khan) आज आपल्या दमदार अभिनयाने फार कमी वेळेत बॉलीवूडमध्ये आपली छाप सोडली आहे. सारा अली खानचे जुने फोटो पहिले तर आपल्यालाच धक्का बसेल. जुन्या फोटोंमध्ये पाहिलं तर सारा अली खानचं वजन अतिशय वाढलं होत. बोललीवूडमध्ये येण्याआधी सारा अली खान फार लठ्ठ होती. त्यावेळी तीच वजन होतं 96 किलो! ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना पण हे खरं आहे. बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधी तिने जवळपास 40-45 किलो वजन कमी केलं. तिचा हा वेटलॉस प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.    

पण साराने कधीच आपल्या जुन्या फोटोंविषयी किंवा वजनाविषयी संकोच बाळगला नाही उलट आपला अनुभव तिने सर्वांसोबत शेअर केला. (sara ali khan weight loss transformation)

वजन कमी करण्यासाठी साराला सर्वात जास्त प्रोत्साहित केलं ते तिच्या आईनेच म्हणजे अभिनेत्री अमृता सिंगने (amruta singh). साराला आधीपासूनच तिच्या आईप्रमाणे अभिनेत्री व्हायचं होतं. यासाठो तिने मनाशी ठरवलं आणि त्यासाठी पावलं उचलायला सुरवात केली.  (sara ali khan weight transformation video story goes viral )

साराला होता हा आजार म्हणून वाढलं होतं वजन

साराला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) हा हार्मोन्स संबंधित समस्या होती ज्यामुळे तीच वजन वाढत चाललं होतं. अश्या आजारात वजनवाढीवर तुमचा कंट्रोल नसतो, मात्र तरीही तिने जिद्द आणि चिकाटीने आपलं वजन कमी करून दाखवलं. 
याविषयी साराने एक अनुभव शेअर केला आहे, जेव्हा विमानतळावर एकदा अमृता सिंग साराला आणील आली होती तिने अक्षरशः तिला ओळखलंच नव्हतं. कारण होतं तीच वाढलेलं वजन. आणि त्यानंतर साराने मनाशी ठरवलं आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. आणि जोपर्यंत वजन कमी करणार नाही तोपर्यंत आईला व्हिडीओ कॉलवरसुद्धा आपला चेहरा दाखवणार नाही. (sara ali khan weight loss transformation)

वजन घटवण्यासाठी साराने केलं हे डाएट

सारा अली खानने वजन कमी करण्यासाठी खास किटो डाएटची मदत घेतली पण याचा काही विशेष फायदा तिला झाला नाही. पण मग तिने नियमित पण पौष्टिक आहार घेण्यास सुरु केले.  ज्यात काही विशेष बदल केले. 

पिझ्झा नको सॅलड

सर्वात आधी साराने जंक फूड सोडलं. पिझ्झा, बर्गर फ्रँकी सारख्या इतर जंक फूडला बाय बाय केलं. तिचे आवडते पदार्थ चॉकलेट, आइस्क्रीमला कायमच बाय बाय केलं.  (junk food disadvantages to health) त्याऐवजी तिने सॅलड खायला सुरवात केली आणि वर्कआउटवर भर दिला त्याचसोबत टेनिससुद्धा खेळू लागली. (sara ali khan weight transformation video story goes viral )

Read More