Marathi News> मनोरंजन
Advertisement

वडिल सैफसोबत अतिशय बोल्ड कपडे परिधान केल्यामुळे सारा अली खान ट्रोल

सोशल मीडियावर 'फादर्स डे'च्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वडिल सैफसोबत अतिशय बोल्ड कपडे परिधान केल्यामुळे सारा अली खान ट्रोल

मुंबई : सोशल मीडियावर 'फादर्स डे'च्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवण करत आहेत. त्याचबरोबर पतौडी कुटुंबाची लाडकी सारा अली खान तिचे वडील सैफ अली खानसोबत लंच डेटवर गेली होती. यावेळी इब्राहिमही सारासोबत होता. पण यादरम्यान साराने असे कपडे घातले होते जे पाहून ट्रोलर्सना अजिबात आवडले नाही आणि तिच्या कपड्यांमुळे अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

शॉर्ट्सपेक्षा मोठा खिसा मोठा
सैफ अली खान आणि इब्राहिमसोबत लंच डेटवर साराने क्रीम रंगाच्या शॉर्ट्ससह पांढरा क्रॉप टॉप घातला होता. अभिनेत्रीचा टॉप खूप लहान होता. याचबरोबर साराने घातलेल्या शॉर्ट्सची लांबी इतकी कमी होती की शॉर्ट्सचे खिसेही त्यापेक्षा लांब होते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ट्रोल होत आहे अभिनेत्री
पापा सैफसोबत लंच डेटवर अभिनेत्रीला असे कपडे परिधान करताना दिसताच ती यूजर्सच्या निशाण्यावर आली आहे. वडिलांसोबत असे कपडे परिधान केल्यामुळे ट्रोलर्स तिला प्रचंड ट्रोल करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं आहे की, 'साराच्या खिशाच्या लांबीपेक्षा तिची पँट लहान आहे.' तर अजून एका यूजरने लिहिलं, 'कोणी लंच डेटला असे कपडे घालतं का? मला वाटलं ती जिमला गेली होती.  अशा अनेक प्रकारच्या कमेंट युजर्स साराच्या या फोटोवर करत आहेत.

Read More