Marathi News> मनोरंजन
Advertisement

'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी साराने स्वत:लाच दिलं 'हे' गिफ्ट?

सारा अली खानने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरूवात केली.

'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी साराने स्वत:लाच दिलं 'हे' गिफ्ट?

मुंबई - बॉलिवूड स्टार किड सारा अली खानने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरूवात केली. त्यानंतर रणवीर सिंहसह आलेल्या 'सिंबा' चित्रपटानेही बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली. परंतु सारा आता पुन्हा एकदा चर्चेत आली असून ही चर्चा आहे तिच्या नवीन घराबद्दल. साराने तिच्या आई अमृता सिंहसोबतचं आपलं घर सोडून तिच्या नवीन घरी शिफ्ट होणार असल्याची चर्चा आहे. 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी साराने स्वत:लाच घर गिफ्ट केल्याचं बोललं जात आहे.

साराने तिच्या इंन्स्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. फोटोत सारा सामानाने भरलेल्या बॉक्सच्या मधोमध बसलेली दिसत आहे. या फोटोसोबत साराने 'एक नवी सुरूवात' असं कॅप्शनही दिलं आहे. या फोटोवरून सारा नवीन घरी शिफ्ट झाली असल्याचं बोललं जात आहे. 

 
 
 
 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

सारा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहतेही आहेत. पदार्पणाच्या चित्रपटातूनच साराने आपल्या अभिनय कौशल्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सुशांत सिंह राजपूरसह चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या साराचे काही कालावधीच अनेक चाहते झाले आहेत. 

Read More