Marathi News> मनोरंजन
Advertisement

सपना चौधरी भेदभावाची शिकार! म्हणाली, 'मी असे कपडे घालणार...'

डान्स म्हटलं की, सपना चौधरी हे नाव प्रत्येकाच्या मनात अगदी सहज येतं. 

सपना चौधरी भेदभावाची शिकार! म्हणाली, 'मी असे कपडे घालणार...'

मुंबई : डान्स म्हटलं की, सपना चौधरी हे नाव प्रत्येकाच्या मनात अगदी सहज येतं. लोक तिला देसी क्वीन, डान्सिंग क्वीन म्हणून ओळखतात. मात्र जरी बाहेरून सगळंकाही चांगलं दिसत असलं, तरी सपनाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा झाला तर, ती अजूनही मनोरंजन विश्वात संघर्ष करत आहे. नुकताच तिने स्वतः भेदभावावर एक मोठा खुलासा केला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सपना चौधरीने एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीतील पक्षपात आणि त्यांच्यासोबतच्या वर्तनाचं रहस्य उघडलं आहे. दिलेल्या एका मुलाखतीत सपनाने सांगितलं की, हिंदी इंडस्ट्री बऱ्याच काळापासून पूर्वग्रहांचा सामना करत आहे.

15 वर्षात खूप त्रास सहन केला
सपना चौधरी म्हणाली, 'मी यावर्षी इंडस्ट्रीमध्ये 15 वर्षे पूर्ण करेन. मला हिंदी चित्रपट किंवा टीव्ही शो मध्ये अभिनय करायचा आहे. पण मला वाटतं की, मी रीजनल इंडस्ट्री  हरियाणामधून आहे. त्यामुळे मला माझी प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत नाही. मला माझी बॉडी दिसतील असे कपडे घालायचे नाहीत. आणि मी धडाधड इंग्रजी बोलू शकत नाही. जे कधीकधी माझ्या करिअरमध्ये अडथळा बनेल. तसंच, माझा कोणताही गॉडफादर नाही आणि हे आणखी एक कारण आहे की, मी हिंदी इंडस्ट्रीमध्ये ब्रेक मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे.

डान्स हे पहिलं प्रेम आहे
अभिनेत्री बनण्याचं आणि लवकरच भूमिका मिळवण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होण्याची आशा आहे. तोपर्यंत ती, तिच्या डान्सवर खूश आहे. ती म्हणाली, 'मी आज जे काही आहे ते माझ्या डान्स शोमुळे आहे. डान्स माझं पहिलं प्रेम आहे आणि असेल. असं नाही की मी माझी डान्सची आवड संपली आहे. परंतु मला इतर गोष्टी देखील एक्सप्लोर करायच्या आहेत. मला आशा आहे की, मला लवकरच काहीतरी काम मिळेल. 'ती पुढे म्हणाली की, अनेकवेळा डिझायनर्सनी शोसाठी तिचे कपडे बनवण्यास नकार दिला आहे. ती म्हणते, 'मी जे पाहिलं ते म्हणजे मुंबईतील लोक तुमच्याशी तेव्हाच बोलतील जेव्हा त्यांना तुमच्याशी काही काम असेल.'' 

सपना 'बिग बॉस 11'चा भाग होती आणि ती म्हणाली की, ''रिअॅलिटी शो केल्यानंतर तिच्या आयुष्यात काही खास बदललेलं नाही. 'लोकांना वाटतं की, शो केल्यानंतर स्पर्धक मोठे सेलिब्रिटी बनतात. पण तसं काहीच नाही''. 

Read More