Marathi News> मनोरंजन
Advertisement

सपना चौधरी, अर्शी खानचा रश्के कमरवर डान्स, सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सपना चौधरी, अर्शी खानचा रश्के कमरवर डान्स, सोशल मीडियावर व्हायरल

बनारस : बिग बॉसच्या सीजन 11 मधील दोन कंटेस्‍टंट घरात जरी यांचं पटत नव्हतं पण घरातून बाहेर पडल्यानंतर मात्र दोघेही 'बेस्‍ट फ्रेंड' बनल्या आहेत. हरियाणाची डांसर सपना चौधरी आणि मॉडल अर्शी खान यांच्या बदल आम्ही बोलतोय. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दोघेही एकत्र दिसत आहेत. शुक्रवारी अर्शी आणि सपना, राखी सावंतसोबत बनारसमध्ये एका लग्न सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी पोहोचल्या. या विवाहात सपना चौधरीने तिचं प्रसिद्ध गाणं 'तेरी आखिया का ये काजल..'वर डान्स केला तर अर्शी खानने 'रश्‍के कमर'वर डान्स केला. अर्शीने जेव्हा 'रश्‍के कमर'वर डान्स केला तेव्हा तिने सपना चौधरीला देखील इशारा करत बोलवलं.

अर्शी आणि सपनाने या गाण्यावर डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ अर्शी खानने तिच्या इंस्‍टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. बनारसच्या आशापूर भागात शुक्रवारी सपा नेते डॉ बहादुर सिंह यादव यांच्या मुलाचं लग्न गाजीपुरच्या रामनगीना यादव यांच्या मुलीशी झालं. या विवाहात अर्शी खान, राखी सावंत आणि सपना चौधरी यांनी परफॉर्म केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. 

 

Good morning mere RASHQE QAMAR 

A post shared by Arshi khan (A.K) (@arshikofficial) on

Read More