Marathi News> मनोरंजन
Advertisement

सर्वाधिक कमाई करणारा 'संजू' हा तिसरा सिनेमा, पहा किती केली कमाई

राजकुमार हिरानी दिग्दर्शित संजू सिनेमा रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वात हिट सिनेमा ठरला आहे.

सर्वाधिक कमाई करणारा 'संजू' हा तिसरा सिनेमा, पहा किती केली कमाई

मुंबई : राजकुमार हिरानी दिग्दर्शित संजू सिनेमा रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वात हिट सिनेमा ठरला आहे. सिनेमाने चार आठवडे बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. लोकप्रिय ठरत असलेल्या या सिनेमाने आतापर्यंत 339.75 कोटीहून अधिक कमाई केली आहे. या कमाईने संजू सिनेमाच्या नावे अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. 

संजूचा पहिला रेकॉर्ड

सर्वात अधिक कमाई करुन संजू सिनेमाने पहिला रेकॉर्ड ब्रेक केला. संजूशिवाय पद्मावत सिनेमाने ३०० कोटींहून अधिक कमाई केली होती. सलमानच्या रेस 3 सिनेमाला मागे टाकत संजूने नवा रेकॉर्ड केला. 

केली इतकी कमाई

संजू सिनेमाने टायगर झिंदा है सिनेमालाही मागे टाकले. या सिनेमाने 339.16 कोटींची कमाई केली होती. या वेळेस संजू सिनेमाहुन आमिर खानचा पीके सिनेमा पुढे आहे. पीके सिनेमाने 340.8 कोटींची कमाई केली होती. पण संजूचा बॉक्स ऑफिसवरील बोलबाला असाच कायम राहिला तर लवकरच पीकेचा रेकॉर्डही ब्रेक होईल. सध्या संजू बॉलिवूडमधील चौथा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. 

रणबीरचे भरभरून कौतुक

या रणबीर कपूरच्या कामाचे भरभरून कौतुक होत आहे. संजय दत्तच्या या बायोपिकने २ दिवसात ५० कोटी आणि ३ दिवसात १०० कोटींची कमाई केली होती. तर १६ दिवसात ३०० कोटींचा आकडा गाठला. संजू सिनेमात रणबीर कपूरशिवाय परेश रावल, विक्की कौशल, मनीषा कोईराला, सोनम कपूर, दीया मिर्जा, अनुष्का शर्मा आणि जिम सरभ यांसारखे कलाकार आहेत. 

Read More