Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणवीर - दीपिकावर संजय लीला भंसाळींचा कौतुकाचा वर्षाव

संजय लीला भंसाळींच्या चित्रपटामध्ये त्यांची खास मेहनत दिसते. चित्रपटाच्या प्रोडक्शनमध्ये जशी मेहनत घेतली जाते तशीच संजय लीला भंसाळी यांच्या चित्रपटातील कलाकारांची निवड खास असते. 

रणवीर - दीपिकावर संजय लीला भंसाळींचा कौतुकाचा वर्षाव

 मुंबई : संजय लीला भंसाळींच्या चित्रपटामध्ये त्यांची खास मेहनत दिसते. चित्रपटाच्या प्रोडक्शनमध्ये जशी मेहनत घेतली जाते तशीच संजय लीला भंसाळी यांच्या चित्रपटातील कलाकारांची निवड खास असते. 

 ऐश्वर्या पहिली पसंत   

 दीपिका पद्मावतीच्या भूमिकेत असली तरीही ऐश्वर्या राय बच्चन ही संजय लीला भंसाळींची पहिली पसंत होती. त्यांच्या तीन चित्रपटांमध्ये ऐश्वर्या बच्चनने काम  केले आहे.  

 दीपिकासोबत अजून काम करणार 

 अभिनेत्री दीपिका पादूकोण यापूर्वी बाजीराव मस्तानी या चित्रपटामध्ये 'मस्तानी'च्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर तिची निवड 'पद्मावती'साठीदेखील करण्यात आली आहे. एका मुलाखतीमध्ये संजय लीला भंसाळींनी दीपिकाचे कौतुक केले आहे. त्यावेळेस दीपिका मेहनती आहे, ती संयमाने काम करते. माझे अजूनही तिच्यासोबत काम करण्याची इच्छा कायम आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

 दीपिका आणि रणवीर  

 दीपिकाप्रमाणेच रणवीर सिंहसोबतही संजय लीला भंसाळी हा तिसअरा प्रोजेक्ट करत आहेत. दीपिका प्रमाणेच रणवीरचेही त्यांनी कौतुक केले आहे. " रणवीरला माझ्याशिवाय इतर कोणी फिल्ममेकर चांगला ओळखत नाही" असे संजय लीला भंसाळी म्हणाले आहेत. रणवीरदेखील खास, हुशार आणि  गुणी कलाकार आहे. त्यामध्ये प्रचंड उर्जा आहे. त्यामुळे रणवीरसोबतही मला अजून खूप काम करायचे आहे असे त्यांनी सांगितले आहे.  

Read More