Marathi News> मनोरंजन
Advertisement

फॅनच्या अतिप्रेमाने संग्राम समेळ हैराण

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडली व्यथा 

फॅनच्या अतिप्रेमाने संग्राम समेळ हैराण

मुंबई : कलाकारावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम करावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. कारण मायबाप रसिकांच हेच प्रेम कलाकाराला बळ देणार असंत. पण याच प्रेमाचा जेव्हा अतिरेख होतो तेव्हा.... असाच अतिरेख मराठमोळा अभिनेता संग्राम समेळला सहन करावा लागत आहे. एका चाहतीकडून संग्रामला दिवसाला अक्षरशः 400 मॅसेजेस येत आहे. यामुळे संग्रामचं खासगी आयुष्य डिस्टर्ब झालं आहे. 

'स्वीटी सातारकर' असं या तरूणीचं नाव असून या चाहतीकडून संग्रामला दिवसाला 300 ते 400 मॅसेजेस येत आहेत. यामुळे संग्रामचं खासगी आणि वैवाहिक आयुष्य डिस्टर्ब झालं आहे. या सगळ्याचा त्रास होत असल्यामुळे त्याने फेसबुक लाईव्ह करून ही गोष्ट शेअर केली आहे. 

संग्रामने फेसबुक लाईव्ह करून स्वीटी सातारकर या मुलीचा आपल्याला मनस्ताप होत असल्याचं म्हटलं आहे. यामुळे आपलं वैवाहिक जीवनही हैराण झाल्याचं तो सांगतो. या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्वीटी सातारकरला ओळखणाऱ्या किंवा तिच्या कुटुंबियांना त्याने तिला समजावण्याची विनंती देखील केली आहे. 

fallbacks

आपण असंख्य प्रयत्न करून थकलो आहोत. आता काय करायचं? कळतं नसल्यामुळे फेसबुक लाईव्ह हा पर्याय स्वीकारला आहे. यामाध्यमातून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. जेणेकरून तो या अडचणीतून बाहेर पडेल आणि त्या मुलीला देखील कोणताही त्रास होणार नाही. यामुळे संग्रामने हे फेसबुक लाईव्ह करून विनंती केली आहे. 

संग्रामने अभिनेत्री पल्लवी पाटीलसोबत डिसेंबर 2016 मध्ये लग्न केलं आहे. संग्राम आणि पल्लवीचे हे लव्ह मॅरेज आहे. संग्राम सध्या 'कुसुम मनोहर लेले' या पुनरुज्जीवित नाटकाचे प्रयोग करत असून  'आनंदी हे जग सारे' या मालिकेत तो काम करतो. 'विक्की वेलिंगकर', 'उंडगा', 'ब्रेव्ह हार्ट' यासारख्या सिनेमात, तर 'ललित 205', 'बापमाणूस', 'दिल्या घरी तू सुखी राहा' यासारख्या मालिकांतही दिसला होता. 

Read More