Marathi News> मनोरंजन
Advertisement

अॅक्टिंगसाठी सोडली पोलीस अधिकाऱ्याची नोकरी

आतापर्यंत आपण अनेक डॉक्टर, इंजिनिअर, बँक कर्मचारी नोकरी सोडून मराठी सिनेमांत पदार्पण करताना पाहिले आहेत. 

अॅक्टिंगसाठी सोडली पोलीस अधिकाऱ्याची नोकरी

मुंबई : आतापर्यंत आपण अनेक डॉक्टर, इंजिनिअर, बँक कर्मचारी नोकरी सोडून मराठी सिनेमांत पदार्पण करताना पाहिले आहेत. 

पण आता गोष्ट समोर आली आहे की, मराठी सिनेमांकरता एका पोलिसाने चक्क आपली खाकी वर्दी उतरवली आहे. आता अभिनय हे करिअर अनेक तरूणांना आकर्षित ककत आहे. अनेक मालिका, सिनेमांमध्ये या कलाकारांना अभिनय करताना आपण पाहतो. 

प्रत्येकजण अभिनयात आपलं नशिब अनुभवण्यासाठी येत असतो. असाच सांगलीचा श्रीकांत पाटील एक. सांगलीत पोलिस कॉन्स्टेबलची नोकरी सोडून अभिनेता श्रीकांत पाटील मुंबई या मायानगरीत आपलं नशिब बदलण्यासाठी आला. खरं म्हणजे श्रीकांतला प्रमोशन मिळालं असून तो सब इन्सपेक्टर पदावर रुजू झाला असता. पण आपल्या वेडासाठी तो मुंबईकडे वळला. 

सहा फूट उंच, गोरा वर्ण, आखीव-रेखीव चेहरा, पिळदार शरीर आणि घारे डोळे असलेला खाकी वेशातला पोलीस पाहून सर्वजण कुतूहलाने श्रीकांतकडे बघत. असा श्रीकांत पाटील "गावठी" या सिनेमांत दिसणार आहे. आनंदकुमार यांनी हा गावठी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. आनंदकुमार यांनी डान्सर आणि दिग्दर्शक रेमो डिसोझा यांच्याकडे 15 वर्षे सहाय्यक म्हणून कार्यरत होता. 

असा होता श्रीकांतचा शिपाई ते अभिनेता प्रवास 

श्रीकांत 5 वर्षाचा असताना त्याच्या क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत असणाऱ्या वडिलांचे निधन झाले. लहानपणीच श्रीकांतवर मोठी जबाबदारी पडली. आईच्या खांद्यावरचा भार हलका करण्यासाठी श्रीकांतने कलेचे वेड बाजूला सारून २०१० साली, वयाच्या एकोणीसाव्या वर्षी पोलीस दलात शिपाईपदावर रुजू झाला. मात्र त्याची आवड त्याला सतत खूणावत होती. 

लहान भावाला नोकरी लागल्यानंतर श्रीकांतने आपल्या मनातील इच्छा आईला बोलून दाखवली. मुलाच्या मनातील तळमळ पाहून त्या माऊलीला देखील जाणीव झाली. आणि तिने परवानगी दिली. सांगलीतून अभिनय क्षेत्रातकडे वळलेली ही दुसरी व्यक्ती. मराठी बरोबरच बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छबी निर्माण करणारी सई ताम्हणकर देखील सांगलीची आहे. 

Read More