Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : प्रेग्नंट Sana Khan ला पतीनं नेलं ओढत; नवऱ्यावर टीका होताच, अभिनेत्रीनं दिलं उत्तर...

Sana Khan Viral Video : सना खाननं मुफ्ती अनसशी विवाह केला आहे. तर सना प्रेग्नंट असून नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी पतीला ट्रोल केल्याचे पाहता सनानं त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याशिवाय यात तिच्या पतीची चूक नसल्याचे तिनं म्हटलं आहे. 

VIDEO : प्रेग्नंट Sana Khan ला पतीनं नेलं ओढत; नवऱ्यावर टीका होताच, अभिनेत्रीनं दिलं उत्तर...

Sana Khan Viral Video : बाबा सिद्दीकी (baba siddique) यांची इफ्तारची पार्टी किती खास असते हे सगळ्यांनाही माहित आहे. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तारच्या पार्टीत अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. त्या सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. दरम्यान, पापाराझींनी असा एक व्हिडीओ शेअर केला आहे जे पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. तर काही नेटकऱ्यांना प्रचंड रागही आला आहे. बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत सना खान आणि तिचा पती मुफ्ती अनस पोहोचले होते. त्यावेळी प्रेग्नंट असलेल्या सनासोबच मुफ्ती अनसनं जे केलं ते पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. त्यानं सनाचा हाथ पकडत तिला खेचत नेलं आहे. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

सना आणि तिचा पती मुफ्ती अनस यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत सना आणि मुफ्ती अनस यांनी कार्यक्रमात जाण्याआधी पापाराझींसाठी पोझ दिल्या हे दिसले. याशिवाय त्यानंतर जे झालं ते पाहून सगळ्यांना राग आला आहे. मुफ्ती अनसनं प्रेग्नंट असलेल्या सनाचा हात पकडून तिला खेचत नेलं आहे. सना या व्हिडीओत बोलताना दिसली की बस आता मला चालता येणार नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर संताप व्यक्त करत एक नेटकरी म्हणाला, 'तिला श्वास तर घेऊ दे.' दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुम्ही तुमच्या गरोदर पत्नीशी नीट वागू शकत नसाल, तर उपवास करून काय उपयोग. कल्पना करा की तिला सर्वांसमोर अशी वागणूक दिली जात आहे, तर चार भिंतींच्या आड तिला कसे वागवले जातं असेल'. तिसरा नेटकरी म्हणाला,'‘तो तिला असे का ओढत आहे… ती गरोदर आहे. मूर्खासारखं वागणं!’ आणखी एक नेटकरी म्हणाला,'अशा परिस्थितीत तिला इतक्या पटापट खेचून घेऊन जाणं शोभत का?' दरम्यान, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी सनाच्या या व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा : R. Madhavan चा मुलगा वेदांतनं पुन्हा भारताचं नाव उंचावलं, 5 गोल्ड मेडलची केली कमाई

fallbacks

दरम्यान, या व्हिडीओवर सनानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 'मी नुकताच हा व्हिडीओ पाहिला. माझ्यासोबतच माझ्या सर्व भाऊ आणि बहिणींना हा व्हिडीओ विचित्र वाटतोय, हे मला माहीत आहे. आम्ही बाहेर आल्यावर ड्रायव्हर आणि कारपासून आम्ही खूप लांब होतो. त्यामुळे मी एकाचजागी नेहमीपेक्षा जास्त वेळ उभे होते. मला घाम येऊ लागला आणि मला अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे अनस मला पटकन आत नेत होता, जेणेकरून मी बसू शकेन आणि पाणी पिऊन शांत बसू शकेन. पापाराझी इतर सेलिब्रिटींचे फोटो काढत असताना आम्हाला त्यांना डिस्टर्ब करायचे नव्हते. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून चुकीचा अर्थ घेऊ नका. तुम्ही केलेल्या काळजीबद्दल पुन्हा एकदा आभार,' अशी कमेंट सनानं केली आहे. 

Read More