Marathi News> मनोरंजन
Advertisement

समांथाने 'पुष्पा' चित्रपटातील 'ओ अंतावा' गाण्यासाठी घेतलं कोट्यवधींच मानधन

समांथाला 'ओ अंतावा' गाण्यासाठी मिळाले कोट्यवधी रूपये  

समांथाने 'पुष्पा' चित्रपटातील 'ओ अंतावा' गाण्यासाठी घेतलं कोट्यवधींच मानधन

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ  प्रभू (Samanth Ruth Prabhu) सध्या तिच्या 'ओ अंतावा' (Oo Antava) गाण्यामुळे तुफान चर्चेत आहे. चाहत्यांनी देखील 'ओ अंतावा'  गाण्याला डोक्यावर घेतलं आहे. सोशल मीडियावर देखील गाण्याचे शार्ट व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. सध्या चर्चेत असलेल्या 'पुष्पा' चित्रपटातील 'ओ अंतावा'  गाणं अभिनेता अल्लू अर्जुन आणि समांथावर चित्रीत करण्यात आलं आहे. 

संपूर्ण चित्रपटात समांथाने 3 मिनिटांच्या आयटम सॉन्गवर डान्स केला आहे. यासाठी समांथाने कोट्यवधी रूपयांचं मानधन घेतलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथाने या गाण्यासाठी पूर्ण 5 कोटी रुपये घेतले आसल्याचं सांगण्यात येत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शिवाय याआधी  'ओ अंतावा' गाण्यावर डान्स नंबर करायला अभिनेत्री संकोच करत होती. पण खुद्द अभिनेता अल्लू अर्जुनने तिला गाणं करण्यासाठी समजूत घातली. त्यानंतर तिने गाण्यावर डान्स करण्यास होकार दिला. 

गाण्याच्या सुरुवातीच्या काही स्टेप्समध्ये तिला अडचण आली होती. पण जशी गाण्याची शुटींग सुरू झाली, त्या प्रवाहासोबत समांथाने गाण्याच्या सर्व स्टेप्स पूर्ण केल्या. तिने कोणत्याचं स्टेपमध्ये बदल केले नाहीत. 

गाण्यातील सामंथाची होणारी चर्चा पाहून तिला 'पुष्पा पार्ट 2' या चित्रपटाच्या डान्स नंबरसाठीही अप्रोच करण्यात येत असल्याची चर्चा आहे. सांगायचं झालं तर 'पुष्पा' चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षकांना 'पुष्पा पार्ट 2'ची प्रतीक्षा आहे. 

Read More