Marathi News> मनोरंजन
Advertisement

विभक्त झाल्यानंतरही Samantha नं नागा चैतन्यच्या भावाला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा, म्हणाली...

Samantha Ruth Prabhu Wishes Ex-Husband Brother Akhil Akkineni: समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यचा घटस्फोट होऊन बराच काळ झाला आहे. तरी देखील ते एकमेकांच्या कुटुंबाशी जुळून आहेत. समंथानं Ex-Husband नागा चैतन्यचा भाऊ अखिल अक्कीनेनीला वाढदिवसाच्या निमित्तानं खास शुभेच्छा दिल्या आहेत.

विभक्त झाल्यानंतरही Samantha नं नागा चैतन्यच्या भावाला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा, म्हणाली...

Samantha Ruth Prabhu Wishes Ex-Husband Brother Akhil Akkineni: दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही सध्या तिच्या आगामी चित्रपट 'शाकुंतलम' मुळे चर्चेत आहे. समंथा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत समंथा ही सक्रिय असल्याचे दिसते. समंथानं तिचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यचा (Naga Chaitanya) भाऊ अखिल अक्किनेनीला (Akhil Akkineni) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

समंथानं ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केली आहे. यावेळी समंथानं अखिल अक्किनेनीला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर करत या खास शुभेच्छा दिल्या आहेत. अखिलचा 28 एप्रिल रोजी ‘एजेंट’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याचाचं हे पोस्टर आहे. हे पोस्टर शेअर करत समंथानं कॅप्शन दिलं की 'वाढदिवसाच्या शुभेच्छा अखिल अक्किनेनी. ‘एजेंट’ हा 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून हा अप्रतिम चित्रपट असणार आहे. खूप खूप प्रेम.' 

fallbacks

अखिल अक्किनेनीनं वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अखिल स्टायलिश दिसत आहे. पण अखिलचा लूक या पोस्टरमध्ये खूप रागिट असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, समंथाच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, समंथाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिचा आगामी चित्रपट 'शाकुंतलम' हा 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. तिचा हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यात तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी आहे. तर तिचा हा चित्रपट ‘शकुंतला’ या नाटकावर आधारीत आहे. या नाटकात अभिनेता देव मोहन हा राजा दुष्यंत यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय समंथाकडे आणखी एक चित्रपट असून त्या चित्रपटात ती दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. हा एक रोमॅंटिक चित्रपट असून तेलगू असणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘कुशी’ आहे. 

हेही वाचा : Urvashi Rautela समोरच मोठी दुर्घटना! केक कापताना उडाला आगीचा भडका अन् नंतर..., धक्कादायक व्हिडीओ समोर

दुसरीकडे नुकताच समंथाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत समंथाला पापाराझींच्या फ्लॅश लाईटमुळे किती त्रास होतो ते पाहायला मिळत आहे. त्रास होऊ लागल्यानंतर समंथानं पापाराझींना फ्लॅश बंद करण्यास सांगितले मात्र, त्यांनी ऐकलं नाही. इतक होऊनही हसत समंथा पापाराझींसाठी पोज देताना दिसली. 

Read More