Marathi News> मनोरंजन
Advertisement

सामंथा-नागा पुन्हा एकत्र? अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमुळे एकच खळबळ

साऊथची सुपरहिट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

सामंथा-नागा पुन्हा एकत्र? अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमुळे एकच खळबळ

मुंबई : साऊथची सुपरहिट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मात्र गेल्या वर्षभरापासून ती नागा चैतन्यसोबतचं नातं संपुष्टात आल्यामुळे खूप चर्चेत आहे. अभिनेत्रीने नागा चैतन्यशी संबंधित सगळं काही त्याला परत केलं आहे आणि तिने तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. मात्र, ती अजूनही अक्किनेनी कुटुंबातील सदस्य आहे आणि तिथल्या काही लोकांबद्दल तिला सहानुभूती आहे. याचा पुरावा म्हणजे तिची नवीन पोस्ट ज्याद्वारे तिने अखिल अक्किनेनीसाठी एक सुंदर पोस्ट लिहिली आहे.

Akhil Akkineni ला Samantha ने दिल्या शुभेच्छा
सामंथाने या पोस्टद्वारे अखिल अक्किनेनीला त्याच्या 28 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पाठवल्या आहेत. अखिल हा नागा चैतन्यचा धाकटा भाऊ आहे आणि नात्यात तो अभिनेत्रीचा दीर होता. तो मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे आणि त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याला अनेक मॅसेज आले, पण त्याच्यासाठी सर्वात खास  होती ती समंथाची ही पोस्ट.

fallbacks

 सामंथाने अखिल अक्किनेनीचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा... यावर्षी तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा. मी आशा करते आणि प्रार्थना करते की, तुम्ही जे काही शोधत आहात ते तुम्हाला मिळेल. देव तुझ्यावर सदैव आशीर्वादाचा वर्षाव करो.

fallbacks

अभिनेत्रीनो आपला एक्स पतीच्या वाढदिवशी कोणतीच पोस्ट शेअर केली नाही . मात्र नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट 'मजिली' सिनेमाची होती. ही पोस्ट या सिनेमाल तीन वर्ष पुर्ण झाल्याच्या निमीत्ताने होती.  या तेलगू रोमँटिक स्पोर्ट्स चित्रपटात सामंथा रुथ आणि नागा चैतन्य यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 5 एप्रिल 2019 रोजी प्रदर्शित झाला होता. घटस्फोट घेतल्यानंतर सामंथाने पहिल्यांदाच तिचा एक्स पतीचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती नागासोबत रोमँटिक पोज देताना दिसतेय.

Read More