Marathi News> मनोरंजन
Advertisement

नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर समंथाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

घटस्फोटानंतर समंथा तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.

नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर समंथाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

मुंबई : Ormax Stars India Loves च्या अभ्यासानुसार साऊथ स्टार्स लोकप्रियतेच्या बाबतीत वरचढ आहेत. टॉप-10 महिला स्टार्सच्या यादीत 5 तेलुगू, 3 हिंदी आणि 2 तमिळ स्टार्सची नावं आहेत. विशेष म्हणजे साऊथची सुपरस्टार समंथा या यादीत पहिल्या क्रमांकावर असून तिच्यापाठोपाठ आलिया भट्ट आहे. या यादीत बॉलिवूडमधील आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ ही तीन नावे आहेत. आलिया दुसऱ्या, दीपिका पाचव्या आणि कतरिना सातव्या स्थानावर आहे.

समंथा करिअरवर लक्ष केंद्रित करते
घटस्फोटानंतर समंथा तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. 'पुष्पा' चित्रपटातील सुपरहिट आयटम साँगमध्ये समांथाने आपल्या अदांनी सर्वांनाच चकित केलं. अभिनेत्रीचं नवीन फोटोशूट देखील सोशल मीडियाचं तापमान वाढवत आहे. यासोबतच नागाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तो अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबतच्या नात्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.

या अभिनेत्रींचाही समावेश होता
या लोकप्रिय स्टार्सच्या यादीबद्दल बोलायचं झालं तर साऊथच्या इतर स्टार्समध्ये नयनतारा तिसऱ्या, काजल अग्रवाल पाचव्या, कीर्ती सुरेश सहाव्या, रश्मिका, पूजा हेगडे आणि अनुष्का शेट्टी अनुक्रमे आठ, नऊ आणि दहाव्या क्रमांकावर आहेत. .

टॉपवर आहे सामंथा रुथ प्रभु
एप्रिलच्या सुरुवातीला Ormax द्वारे भारतातील  संशोधन अहवालानुसार, समंथा प्रभू या यादीत अव्वल स्थानावर आहे. ज्यात चित्रपट उद्योगातील तसंच संपूर्ण भारतातील इतर मोठ्या नावांचा समावेश आहे. 

Read More