Marathi News> मनोरंजन
Advertisement

'उर्वशी'च्या तालावर सलमान थिरकतो तेव्हा...

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हि़डिओमध्ये तो 'उर्वशी' गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

'उर्वशी'च्या तालावर सलमान थिरकतो तेव्हा...

मुंबई : बॉलिवूड दबंग खान सलमान सध्या त्याच्या आगामी 'दबंग ३' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शुटींगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत सलमानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हि़डिओमध्ये तो 'उर्वशी' गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्याच्यासोबत नृत्यदिग्दर्शक, अभिनेता प्रभुदेवा, दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप, चित्रपट निर्माता साजिद नडियादवाला या कलाकारांनी देखील आनंदी क्षणाचा अनुभव घेतला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Dance class from the master himself Prabhu Deva @kichchasudeepa @wardakhannadiadwala

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमानचा 'भारत' चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे. ५ जून रोजी रूपेरी पडद्यावर दाखल झालेल्या चित्रपटाने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'भारत' चित्रपटाने चाहत्यांना उत्तम ईदी दिली. चित्रपट भारत देशातच नव्हे तर, ७० देशांमध्ये तब्बल १हजार ३०० स्क्रीनवर प्रकर्शित करण्यात आला होता.

'भारत' चित्रपटाच्या दमदार यशानंतर सलमानची पाऊले 'दबंग ३' चित्रपटाकडे वळली आहेत. 'दबंग ३' चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, अरबाझ खान मुख्य भूमिकेत झळणार आहेत. 'दबंग ३'नंतर सलमान पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर आलिया भट्टसह संजय लीला भंन्साळी यांच्या 'इंशाल्लाह' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Read More