Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ ने कमाईचा हा रेकॉर्ड केला नावावर!

सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाला रिलीज होऊन आता १६ दिवस झाले आहेत.

सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ ने कमाईचा हा रेकॉर्ड केला नावावर!

मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाला रिलीज होऊन आता १६ दिवस झाले आहेत. अजूनही या सिनेमाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

सर्वात वेगवान कमाई 

‘टायगर जिंदा है’ या सिनेमाने १६ दिवसात ३०० कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्यासोबतच हा सिनेमा सर्वात वेगवान ३०० कोटी रूपयांची कमाई करणा-या क्लबमध्ये सामिल झाला आहे. याआधी ‘बाहुबली २’ ने सिनेमाने १० दिवसात ३०० कोटी रूपयांची कमाई केली होती. त्यानंतर आमिर खानच्या ‘दंगल’ने १३ दिवसात ३०० कोटी रूपयांची कमाई केली होती. 

सलमानने स्वत:चे तोडले रेकॉर्ड

‘टायगर जिंदा है’ सिनेमाने आत्तापर्यंत ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुलतान’सिनेमांचे अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ सिनेमाने २० दिवसात ३०० कोटी रूपये तर सुलतान सिनेमाने ३५ दिवसात ३०० कोटी रूपये कमावले होते. 

आत्तापर्यंतची एकूण कमाई

‘टायगर जिंदा है’ या सिनेमाने आत्तापर्यंत एकूण ३०८ रूपयांची कमाई केली आहे. जाणकारांनुसार हा सिनेमा ३२० ते ३४० कोटी रूपयांचं लाईफ टाईम कलेक्शन करेल. हा संपूर्ण आठवडा टायगरच्या नावावर आहे. कारण दुसरा कोणताही मोठा सिनेमा नाहीये. पण शुक्रवारी काही मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत. त्यामुळे टायगरला फटका बसू शकतो.

Read More