Marathi News> मनोरंजन
Advertisement

'इथे' साजरा करणार सलमान आपला वाढदिवस...

बॉलिवूड सेलिब्रेटींचा वाढदिवस म्हणचे कलाकार आणि चाहत्यांच्या उत्साहाला उधाण येते.

'इथे' साजरा करणार सलमान आपला वाढदिवस...

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रेटींचा वाढदिवस म्हणचे कलाकार आणि चाहत्यांच्या उत्साहाला उधाण येते. बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आज वाढदिवस. त्याचा चाहतावर्ग प्रचंड आहे. आज तो वयाची ५२ वर्ष पूर्ण करत आहे. यानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. इतकंच नाही तर, #HappyBirthdaySalmanKhan हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आहे. 

चाहत्यांमध्ये उत्सुकता

सलमान आपला बर्थडे कसा आणि कुठे साजरा करणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. पण दरवर्षीप्रमाणे सलमान आपला बर्थडे त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर साजरा करणार आहे.या पार्टीला खान कुटुंबियातील सर्व सदस्य तसंच मलायका अरोरा, अमृता अरोरा, लूलिया वंतूर यांचीही वर्णी लागणार असल्याचे समजतंय. त्याचबरोबर बॉलिवू़डमधील काही खास आणि जवळचा मित्रपरिवार देखील भाईजानच्या बर्थडे पार्टीला उपस्थित राहतील.

किंग खानने अशा दिल्या शुभेच्छा...

सलमानचा बर्थडे फिव्हर सर्वांवरच चढला आहे. किंग खानने ही एका कार्यक्रमात ‘तुम जियो हज़ारों साल सालके दिन हो पचास हजार’, या गाण्याच्या ओळी गुणगुणत सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Read More