Marathi News> मनोरंजन
Advertisement

Salman Khan : सलमान खान सुपरस्टार असूनसुद्धा फाटके shoes का घालतो? पलक आणि जस्सीने केला धक्कादायक खुलासा

Salman Khan : सलमान खान हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आहे. पण तुम्हाला माहित आहे का की एवढा मोठा सुपरस्टार असूनसुद्धा  सलमान फाटलेले बूट घालतो...याबाबत स्टार्स पलक तिवारी आणि जस्सी गिल यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

Salman Khan : सलमान खान सुपरस्टार असूनसुद्धा फाटके shoes का घालतो? पलक आणि जस्सीने केला धक्कादायक खुलासा

Salman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (salman khan) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'च्या (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शित फरहाद सामजींच्या या चित्रपटात पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबती, शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी आणि इतर अनेक कलाकार आहेत. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 21 एप्रिलला सलमानचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सलमान खानसह सर्व स्टार्स या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. यादरम्यान पलक तिवारी आणि अभिनेता जस्सी गिल यांनी सलमानच्या आयुष्याशी संबंधित एक खुलासा केला आहे. 

अभिनेत्री पलक तिवारी आणि जस्सी गिल (Palak Tiwari and Jassi Gill) यांनी सलमान खान सुपरस्टार असूनसुद्धा नेहमीच सर्वसामान्य लोकांसारखा वावरतो. कधी कधी सलमान खान फक्त चप्पल आणि शॉर्ट्स घालून सेटवर येतो. त्यानंतर पलक तिवारीनेही त्यांच्या शूजचा उल्लेख केला. पलकने सांगितले की, सलमान खान एवढा मोठा स्टार आहे, इतका पैसा आहे, पण तरीही त्याच्या बुटांना छिद्र पडले आहेत. सलमान नेहमी लेदरचे शूज घालतो आणि  ते पण फाटलेले असतात. यावर सलमान खानने देखील खुलासा केला आहे की, तो फाटके शूज का घालतो?  सलमान खान स्वतः म्हणतो की, त्याला या शूजमध्ये खूप आरामदायक वाटते.

पलक तिवारी आणि जस्सी गिलने सांगितले की, आम्ही एकदा हिम्मत करुन त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी मोकळेपणाने उत्तर दिले. यावर सलमान खानने म्हटले की, त्याला याच शूजमध्ये कम्फर्टेबल वाटतं. दुसऱ्या कोणत्याच शूजमध्ये त्याला इतका कंफर्ट मिळत नाही. त्यामुळे सलमान खानचे लेदरचे शूज फाटलेले असूनसुद्धा तो तेच घालणे पसंत करतो. 

'किसी का भाई किसी की जान' कधी रिलीज होणार?

'किसी का भाई किसी की जान'चा (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) ट्रेलर अजूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता हा सिनेमा 24 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read More