Marathi News> मनोरंजन
Advertisement

'प्रेमाच्या नात्यात सलमानचा विश्वासघात झालाय' असं म्हणणारी ही तरुणी आहे तरी कोण?

Salman Khan Love Life : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायमच चाहत्यांच्या आवडीचा विषय. म्हणे याच सलमानाचा कोणीतरी विश्वासघात केलाय...   

'प्रेमाच्या नात्यात सलमानचा विश्वासघात झालाय' असं म्हणणारी ही तरुणी आहे तरी कोण?

Salman Khan Love Life : अभिनेता सलमान खान यानं गेली कित्येक दशकं हिंदी कलाजगतावर राज्य केलं. आघाडीच्या अभिनेत्यांना टक्कर देत त्यानं स्वत:चा चाहता वर्गही निर्माण केला. सलमान खान हा कायमच त्याच्या चित्रपटांमुळं जितका चर्चेचा विषय ठरला तितकाच तो त्याच्या स्वभावामुळंही अनेकांच्याच मनाचा ठाव घेताना दिसता. असा हा अभिनेता आणखी एका कारणामुळं कायमच चर्चांच्या केंद्रस्थानी राहिला. ते कारण म्हणजे त्याचं खासगी आयुष्य. 

दरवर्षी सलमानचा वाढदिवस येतो तेव्हातेव्हा त्याच्या वयाच्या वाढत्या आकड्याकडे लक्ष जातं. असं असलं तरीही तो आतासुद्धा बॉलिवूडचा 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' ठरत आहे. त्याच्या आयुष्यात प्रेमाचं आणि हक्काचं कुणी आलं नाही असं नव्हतंच मुळी. कारण, सलमानचं नावही बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं गेलं. 

हेसुद्धा वाचा : अमेरिका कोणत्या भारतीयाच्या तालावर थिरकतेय माहितीये? US च्या मुख्य सचिवांचा मोदींसमोरच खुलासा

ऐश्वर्या रायपासून अगदी कतरिना कैफपर्यंत अनेक अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं. संगीता बिजलानीसोबत तर त्याचं लग्नही ठरलं होतं. पण, काही कारणास्तव हे नातंच आकारास आलं नाही. गेल्या काही वर्षांपासून सलमानच्या आयुष्यात लुलिया वंतूर नावाची मॉडेल/ डान्सर त्याची साथ देत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानं मात्र कधीही या चर्चांना, वृत्तांना दुजोरा दिलेला नाही. याच सलमानविषयी एका अभिनेत्री आणि ज्योतिशविद्येची जाण असणाऱ्या तरुणीनं मोठा खुलासा केला आहे. 

रिअॅलिटी शोमुळं चर्चेत आलाय चेहरा... 

एका रिअॅलिटी शोमुळं चर्चेत आलेला हा चेहरा आहे बिबिका ध्रुवेचा. दंतचिकित्सक असणाऱ्या बिबिकानं तिच्याच वडिलांच्या पावलावर पाऊस ठेवत ज्योतिषविद्येमध्ये रुची दाखवली आणि त्यानंतर तिनं अभिनय क्षेत्रात नशीब आजमावलं. आता याच बिबिकानं रिअॅलिटी शोमधील सहस्पर्धकासोबत संवाद साधताना थेट सलमानच्याच खासगी आयुष्यावर भाष्य केलं. 

सलमानचा प्रेमाच्या नात्यात विश्वासघात झालाय का? असा प्रश्न विचारला असता 'भयंकर', अशा शब्दांत तिनं क्षणातच या प्रश्नाचं उत्तर दिलं. तो जरी राकट दिसत असला तरीही मनानं फारच हळवा आहे असं म्हणत सलमानला नेमकी कशी जोडीदार हवीये यावरूनही तिनं पडदा उचलला. आई- वडिलांची सेवा करणारी, पतीला समजून घेणारी आणि एखादी कुटुंबवात्सव्य जोडीदार तो शोधतोय असंही ती म्हणाली. बिबिकानं केलेला हा दावा पाहता अनेकांच्याच भुवया उंचावल्या आणि पुन्हा एकदा त्याच्या लग्नाच्या चर्चांनी डोकं वर काढलं. 

Read More