Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानची लाडकी बहिण बनली मुंबईतील कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण, कशी एकदा पाहाच?

सलमान खानची बहीण अर्पिता खानने मोठी इव्हेंटमेंट केली आहे. 

सलमानची लाडकी बहिण बनली मुंबईतील कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण, कशी एकदा पाहाच?

मुंबई : सध्या बॉलिवूड स्टार्स मुंबईत एकामागून एक नवीन प्रॉपर्टी खरेदी करत आहेत. नुकतीच बातमी समोर आली होती की, अभिनेत्री काजोलने मुंबईत 11 कोटींचे दोन फ्लॅट विकत घेतले आहेत. आता आणखीनं एका सेलिब्रिटीने मुंबईत कोटींची संपत्ती विकत घेतली आहे. सलमान खानची बहीण अर्पिता खानने मोठी इव्हेंटमेंट केली आहे. 

सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माने मुंबईत 1750 स्क्वेअर फुटाचे घर विकत घेतले आहे, ज्यामध्ये 4 कार पार्किंग देखील आहेत. हे घर त्यांनी 10 कोटींना विकत घेतले आहे. हे घर खार पश्चिम, मुंबई येथे आहे. रिपोर्टनुसार, हे घर फ्लाइंग कार्पेट बिल्डिंगच्या 12व्या मजल्यावर आहे. याची नुकतीच नोंदणी करण्यात आली आहे.

सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्माने या घरासाठी 40 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. याआधी डिसेंबरमध्ये बातमी आली होती की, सलमान खानने मुंबईतील एक प्रॉपर्टी भाड्याने घेतली आहे. 

अभिनेत्याने शिवस्थान हाइट्स, बांद्रा वेस्ट, मुंबई येथे त्याचे अपार्टमेंट दर महिना 95,000 रुपये भाड्याने दिल्याचं बोललं जात होतं आहे. अर्पिता खान शर्माने 2014 मध्ये अभिनेता आयुष शर्माशी लग्न केले. दोघांना दोन मुलेही आहेत.

मुलाचे नाव अहिल आणि मुलीचे नाव आयत आहे. या दोघांची जोडी सोशल मीडियावर चांगलीच पसंत केली जात आहे. पनवेल फार्महाऊस देखील अर्पिताचे आहे, जे भाऊ सलमान खानने तिला लग्नाच्या निमित्ताने भेट म्हणून दिले होते. एवढेच नाही तर अर्पिताच्या लग्नात त्याने कोट्यवधी रुपये खर्च केले होते.

Read More