Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमाननं बर्थडे साँग गाताच अनंतला हसू अनावर! नेटकरी म्हणे, 'भाई काहीपण कर, पण तू...'

Salman Khan at Anant Ambani Bithday : सलमान खानचा अनंत अंबानीच्या प्री बर्थ डे बॅशमधील व्हिडीओ व्हायरल... अनंत अंबानीसाठी भाईजाननं गायलं बर्थ डे गाणं... 

सलमाननं बर्थडे साँग गाताच अनंतला हसू अनावर! नेटकरी म्हणे, 'भाई काहीपण कर, पण तू...'

Salman Khan at Anant Ambani Bithday : रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमॅन मुकेश अंबानी यांचा सगळ्यात लहाण मुलगा अनंत अंबानीचा आज 10 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. आज अनंत अंबानी हा 29 वर्षांचा झाला आहे. त्यानिमित्तानं कालचा जामनगरमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यापैकी एका व्हिडीओत सलमान खान हा अनंतच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच बर्थडे सॉन्ग गाताना दिसला. सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर सगळ्यांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्य होत आहे. 

अनंत त्याचा वाढदिवस हा तिथेच साजरी करणार आहे जिथे त्याच्या प्री-वेडिंगचा कार्यक्रम झाला आणि ते म्हणजे जामनगर. अनंतच्या प्री-वेडिंग नंतर पुन्हा एकदा संपूर्ण बॉलिवूड आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे. आता प्री-बर्थडे नाइटवर अनंतसाठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या निमित्तानं काही व्हिडीओ समोर आले आहेत ज्यात सलमान खान हे बी प्राकसोबत गाणं गाण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमानचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत सलमानला गाताना पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला की "सलमान भाई काही पण कर पण गाणं गाऊ नकोस." दुसरा नेटकरी म्हणाला की "पैसा असेल तर सगळ्यांसमोर सलमानला गाणं गायला सांगून त्याची पण खिल्ली उडवता येते." तिसरा नेटकरी म्हणाला, "अनंत अंबानी हा सलमान खानचा खूप मोठा चाहता आहे हे दिसतंय." आणखी एक नेटकरी म्हणाला, "हा अनंत भाईजानचा पाठलाग का सोडत नाही." दुसरा नेटकरी म्हणाला, "या अंबानीच्या मुलाची जेव्हा इच्छा होते तेव्हा सलमानला खेळायला बोलावून घेतो." तिसरा नेटकरी म्हणाला, "सलमान गातोय, पण मला लाज वाटते." आणखी एक नेटकरी म्हणाला, "भाईच्या बाजुनं मी सगळ्यांची माफी मागतो."

हेही वाचा : वडील हिंदू, आई ब्रिटिश मराठी मुस्लिम, 'या' अभिनेत्रीनं पतीसाठी इस्लाम स्वीकारला अन् मुलाचं नाव ठेवलं मिखैल

दरम्यान, बी प्राकनं या निमित्तानं काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यात तो अनंतच्या वाढदिवसानिमित्तानं परफॉर्म करताना दिसत आहे. त्याशिवाय त्यानं कुटुंबातील सदस्यासारखी वागणूक देण्यासाठी आभार मानले. दरम्यान, आजही अनेक सेलिब्रिटी अनंतच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावतील असं नेटकऱ्यांना वाटत आहे. इतकंच नाही तर त्यांच्या पार्टीतील असेच व्हिडीओ पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. 

Read More