Marathi News> मनोरंजन
Advertisement

Salman Khan च्या 'त्या' फोटोशी टायगर श्रॉफच्या आईचा काय संबंध?

त्यांच्या या व्हिडीओवर टायगर श्रॉफची एक्स गर्लफ्रेंड दीशा पटानीनही कमेंट केली आहे. 

Salman Khan च्या 'त्या' फोटोशी टायगर श्रॉफच्या आईचा काय संबंध?

Salman Khan Old Photo: सलमान खान (Salman Khan) लवकरच आपल्या चाहत्यांना खुश करण्यासाठी मोठ्या पडद्यावर येणार आहे. परंतु तुम्हाला माहितीये का सलमान खाननं आपली पहिली जाहिरात या खास व्यक्तीसोबत केली होती. त्याचा फार जुना फोटो व्हायरल होतो आहे जो एका लोकप्रिय अभिनेत्रीनं तिच्या इन्टाग्राम अकांऊटवरून शेअर केला आहे. ती अभिनेत्री आहे आएशा श्रॉफ (Ayesha shroff) म्हणजे टायगर श्रॉफची आई. (Tiger Shroff mother). (salman khan old photo goes viral tiger shorffs mother ayesha shroff clicks his picture throwback photo viral). 

तिने एका सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला जो 1983 चा आहे. जो सलमानचा पहिला जाहिरात शूट होता. व्हिडिओमध्ये सलमान खुपच स्लिम ट्रीम दिसतो आहे. या जाहिरातीत सुनील निश्चॉल, शिराज मर्चंट, आरती गुप्ता आणि व्हेनेसा वाझ देखील होते.. तिने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच तिच्या इंडस्ट्रीतील मित्रांनी कमेंट्सचा पाऊस केला.

त्यांच्या या व्हिडीओवर टायगर श्रॉफची एक्स गर्लफ्रेंड दीशा पटानीनही कमेंट केली आहे. 

fallbacks

सलमान खानने 1988 मध्ये रेखा, फारूख शेख आणि बिंदू यांची प्रमुख भूमिका असलेल्या बीवी हो तो ऐसी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने फारुख शेखच्या भावाची भूमिका साकारली होती. पुढे 1989 मध्ये भाग्यश्री सोबतच्या मैने प्यार किया या चित्रपटात त्याने मेन रोल केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला होता आणि सलमानला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. सलमान खान आता गॉडफादर आणि टायगर 3 मध्ये दिसणार आहे.

Read More