Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानकडून 'दबंग 3'च्या सहकलाकाराला BMW गिफ्ट

कारची किंमत ऐकून व्हाल थक्क 

सलमानकडून 'दबंग 3'च्या सहकलाकाराला BMW गिफ्ट

मुंबई : सलमान खान कायमच आपल्या दानशूरपणाकरता लोकप्रिय आहे. असाच दानशूरपणा त्याचा समोर आला आहे. सलमान खानचा 'दबंग 3' सिनेमा रिलीज झाला आहे. त्याने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची मन देखील जिंकली. यावरूनच सलमान खानने 'दबंग 3' च्या सहकालाकाराला आनंदात चक्क BMW कारच गिफ्ट केली आहे. 

'दबंग 3' सिनेमात प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत किच्चा सुदीप असून यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. यामुळे सलमानने त्यांना कार गिफ्ट केली आहे. एवढंच नव्हे तर सलमानने ही BMW कार स्वतः किच्चा यांच्या घरी जाऊन गिफ्ट केली आणि छान असं सरप्राईज दिलं आहे. याचा उल्लेख किच्चा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर केला आहे. 

किच्चा सुदीप यांनी इंस्टाग्रामवर एक इमोशनल पोस्ट लिहून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सलमानसोबत किच्चा अनेक मस्ती करताना दिसत आहे. 'तुम्ही चांगलं काम केलात तर तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतात' असं कॅप्शन देत सुदीपने पोस्ट शेअर केले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी सलमानने त्याच्या घरातील पाळीव कुत्र्याचा फोटो असलेला खास जॅकेट सुदीपला दिला होता.

मिळालेल्या माहितीनुसार या कारची किंमत ही 1.7 करोड रुप मिळालेल्या माहितीनुसार या कारची किंमत ही 1.7 करोड रुपये इतकी आहे. या अगोदर सलमान खानने सुदीप यांना एक जॅकेट देखील गिफ्ट केलं होतं. किच्चा सुदीप हे साऊथचा स्टार म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडचा दबंग 3 हा सिनेमा किच्चा सुदीप यांचा डेब्यू सिनेमा आहे. ये इतकी आहे. या अगोदर सलमान खानने सुदीप यांना एक जॅकेट देखील गिफ्ट केलं होतं. किच्चा सुदीप हे साऊथचा स्टार म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडचा दबंग 3 हा सिनेमा किच्चा सुदीप यांचा डेब्यू सिनेमा आहे.

Read More