Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचं पाकिस्तान कनेक्शन उघड; लॉरेंस बिश्नोई गॅंगनं... पोलिसांनाही धक्का

Salman Khan Firing Case:  सलमान खानच्या घरावर फायरिंग प्रकरणात एक मोठा खुलासा...

सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचं पाकिस्तान कनेक्शन उघड;  लॉरेंस बिश्नोई गॅंगनं... पोलिसांनाही धक्का
Updated: Jul 02, 2024, 10:36 AM IST

Salman Khan Firing Case: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घराच्या बाहेर फायरिंग प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आला आहे. सुत्रांनुसार, अशी माहिती समोर आली आहे की लॉरेंस बिश्नोई गॅंगने सलमान खानची सुपारी ही 25 लाख रुपयांसाठी दिली होती. बिश्नोई गॅंगनं हे सगळं सलमानच्या हत्येसाठी केली होती. तर त्यासाठी 18 पेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांना तयार केलं. त्यानंतर त्या मुलांना पुढे गोल्डी बराड आणि अमनोल बिश्नोईच्या आदेशांची प्रतीक्षा होती. हा खुलासा पोलिसांनी त्यांच्या चार्जशीटमध्ये केला आहे. नवी मुंबई पोलिसांनी लॉरेंस बिश्नोईच्या गॅंग मधल्या 5 लोकांना अटक केली आहे. 

350 पानांची चार्जशीट

पोलिसांनी त्यानंतर अटक केलेल्या या 5 आरोपिंविरोधात 350 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. त्या चार्जशीटमध्ये हे सगळे खुलासे करण्यात आले आहेत. पोलिसांनी चार्जशीटमध्ये म्हटलं की सलमानच्या हत्येचा प्रयत्न करणारे आरोपी हे पाकिस्तानमधून मॉडर्न कारतुस  आणि त्यासोबत एके 47, एके 92 आणि एम 16 आणि तुर्कीत निर्मित करण्यात येणारं जिगाना हे कारतुस खरेदी करण्याची त्यांची तयारीत होते. अशा प्रकारच्या शस्त्रांनी पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आली होती. 

60-70 लोकं सलमानवर ठेवत होते लक्ष

या सगळ्या कारतुसांचा वापर करुन ते सलमानची हत्या करण्याच्या प्रयत्नात होते. सुत्रांनुसार, पोलिसांनी चार्जशीटमध्ये सांगितलं की सलमानला मारण्याची सगळी प्लॅनिंग ही ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 मध्ये झाली. जवळपास 60-70 लोकं हे सलमानच्या छोट्या-छोट्या गोष्टींवर नजर ठेवून होते. पोलिसांनी केलेल्या तपासणीत हे समोर आलं की सगळे सलमान खानच्या मुंबई घरातील, पनवेल फार्म हाउस आणि गोरेगाव फिल्म सिटीमध्ये ते सतत प्रवास करत होते. पोलिसांनी म्हटलं की सगळे शूटर हे गोल्डी बराड आणि अनमोल बिश्नोईच्या ऑडरची प्रतीक्षा करत होते की कसा पुढे जाऊन  त्याला पाकिस्तानी कारतुसांनी सलमान खानवर हल्ला करतील. सगळे शूटर पुणे रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि गुजरातमध्ये लपल्याची माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा :  कीमोथेरेपीच्या आधी हिना खाननं लावली होती अवॉर्ड शोला हजेरी, रुग्णालयापर्यंतचा प्रवास पाहून चाहते भावूक

सलमान खानच्या वांद्रे स्थित गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर 14 एप्रिल रोजी गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समरो आली होती. या घटनेनंतर संपूर्ण बॉलिवूडला आश्चर्य झालं होतं. मुंबईतील अंडरवर्ल्ड संपलं तरी बॉलिवूडनं शांतीनं श्वास घेतला नाही. सलमान खानशी काळवीटच्या शिकार केल्या प्रकरणात बिश्नोई गँग नाराज असल्यानं हे सगळं करत आहे. त्यांना सलमान खालना एक धडा शिकवायचा आहे.