Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानसोबत झळकलेल्या अभिनेत्रीला कोरोना पण टेस्ट करण्याचेही पैसे नाहीत

कोरोनाची तपासणी करायलाही तिच्याकडे पैसे नसल्याचे सांगण्यात येतंय. 

सलमानसोबत झळकलेल्या अभिनेत्रीला कोरोना पण टेस्ट करण्याचेही पैसे नाहीत

नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये बॉलीवुड इंडस्ट्री तणावातून जातेय. हाताला काम नसल्याने पोट भरणं कठीण झालंय. दुसरीकडे देशभरातील कोरोना व्हायरसची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. बॉलिवूडमधील अनेकजण कोरोनाच्या विळख्यात सापडलेयत. नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा डडवालला कोरोनाची लक्षण आढळली आहेत. पण कोरोनाची तपासणी करायलाही तिच्याकडे पैसे नसल्याचे सांगण्यात येतंय. 

पूजा डडवालला सर्दी, खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास, खायला चव नसणं अशी लक्षणं आढळली आहेत. तिच्याकडे आता खर्चाला पैसै नाहीत. एकेकाळचा सहाय्यक अभिनेता सलमान खानकडे तिने मदत मागितलीय. १९९५ मध्ये आलेल्या वीरगती सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं. पूजाची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली असून तिेने आपल्या जवळच्या मित्रांकडे पैसे मागितले होते. सलमानकडे तिेने याआधी देखील मदत मागितली होती. तेव्हा सलमानने तिच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली होती. 

सुशांतच्या आत्महत्येचा धक्का, घरातील या व्यक्तीचा मृत्यू 

तिच्या बाजुला ४ कोरोनाचे रुग्ण सापडले असून तिला टेस्ट करण्याचा सांगण्यात आलंय. सध्या आजारी असलेली पूजा पतीसोबत गोव्यात राहतेय. तिची आर्थिक स्थिती बिकट असून खर्च करण्यासाठी देखील पैसे नसल्याचे तिने सांगितले.

Read More