Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऐश्वर्या की कतरिना सर्वात सुंदर कोण? सलमान खानला विचारला प्रश्न, अभिनेता म्हणतो...

Salman Khan And Aishwarya Rai: सलमान खान ह्याचे अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले होते. सध्या सलमानचा एक व्हिडिओ समोर येत आहे. 

ऐश्वर्या की कतरिना सर्वात सुंदर कोण? सलमान खानला विचारला प्रश्न, अभिनेता म्हणतो...

सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्याविषयी अद्यापही चर्चा होतात. 90च्या काळात बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोडपं म्हणजे ऐश्वर्या-सलमान हे होतं. आता पुन्हा एकदा त्यांची चर्चा होताना दिसत आहे. त्याला कारण ठरलंय ते म्हणजे करण जोहरचा एक व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे. यात करण जोहर सलमान खानला काही प्रश्न विचारताना दिसत आहे. त्याने सलमान खानला त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय बच्चन आणि कतरिना कैफसंदर्भात एक प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

करण जोहर आणि सलमान खानचा एक व्हिडिओ रेडिटवर समोर आला आहे. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे. जेव्हा सलमान खान कॉफी विथ करण या कार्यक्रमात पोहोचला होता. त्यावेळी करण जौहरने त्याला ऐश्वर्या आणि कतरिना यांच्यासंदर्भात एक प्रश्न विचारला होता. त्यावर सलमाननेही उत्तर दिलं आहे. 

व्हिडिओत करण जौहर सलमान खानला प्रश्न विचारताना दिसत आहे की, ऐश्वर्या राय बच्चन की कतरिना कैफ दोघांपैकी सर्वात सुंदर कोण? याचे उत्तर देताना सलमान खान पहिल्यांदा ऐश्वर्या राय बच्चनचे नाव घेतो. त्यानंतर तो कतरिनालाही सुंदर असल्याचे म्हणतो आहे. त्यानंतर तो मस्करीत म्हणतोय की, आता त्यांच्या (कतरिना कैफ) नावामागे कोणाचे अडनाव जोडते ते पाहूयात. सलमान खान मस्करीत बोलताना दिसून येतेय. रेडिटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. मात्र, नंतर हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला. 

सलमान खानची लव्ह स्टोरी

संजय लीला भन्साळी यांचा हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ऐश्वर्या राय आणि सलमान खान हे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतर दोघांचेही ब्रेकअप झाले. सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने 2007 साली अभिषेकसोबत लग्न केले. लग्नाच्या चार वर्षांनंतर ऐश्वर्याने मुलगी आराध्याला जन्म दिला. तर, एकीकडे सलमान खानचे वारंवार कतरिना कैफसोबत नाव जोडले जात होते. असं म्हणतात की हे दोघेही डेट करत होते. मात्र, 9 डिसेंबर 2021 मध्ये कतरिनाने विकी कौशलसोबत लग्न केले. 

Read More