Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमाननं केलं कतरिनाच्या नवऱ्याला इग्नोर? नक्की काय घडलं... पाहा VIDEO

Salman Khan Vicky Kaushal Video: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे सलमान खान आणि विकी कौशलच्या 'त्या' (Salman Khan Viral Video) व्हायरल व्हिडीओची. त्यामुळे सलमान खान पुन्हा एकदा हैराण झाले आहेत. यावेळी सलमान खाननं नक्की काय केलं? 

सलमाननं केलं कतरिनाच्या नवऱ्याला इग्नोर? नक्की काय घडलं... पाहा VIDEO

Salman Khan Vicky Kaushal Video: सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती म्हणजे सलमान खानची. काल त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. जो पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे या व्हिडीओखाली चाहत्यांच्या (Salman Khan Ignoring Vicky Kaushal) सकारात्मक कमेंट्सही येताना दिसत आहेत. परंतु आता सलमान खानचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्याची एकही संधी सोडली नाहीये. सोशल मीडियामुळे आता जग फारच जवळ आलं आहे. त्यामुळे आपल्यापर्यंत हे सेलिब्रेटी सोशल मीडियावरून अधिक पोहचताना दिसतात. त्यांच्या प्रत्येक हालचाली आपल्यापर्यंत पोहचत असतात. म्हणून सेलिब्रेटी ट्रोल व्हायलाही जास्त वेळ लागत नाही. 

सध्या सलमानच्या या व्हिडीओमुळे (Salman Khan Video) तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्यानं कतरिनाच्या नवऱ्याला विकी कौशलला अक्षरक्ष: दुर्लक्षित केलं आहे. आयफिया अवोर्ड्सच्या निमित्तानं तारांकित मंडळी एकत्र जमली होती. त्यावेळी सलमान आणि विकी कौशलही स्पॉट झाले होते. परंतु नक्की सलमान खाननं केलंय तरी काय आणि विकी कौशलला दुर्लक्षित करण्यासारखं असं होतं तरी काय असे प्रश्न तुम्हालाही पडले असतीलच. चला तर मग जाणून घेऊया की हा व्हिडीओ नक्की का व्हायरल होतोय ते. 

हेही वाचा - एअरपोर्ट आहे की मॉडलिंग रॅम्प, बोल्ड ड्रेसमुळे Sherlyn Chopra झाली ट्रोल

सध्या आयफियाचा माहोल सुरू होणार आहे. त्यामुळे सिनेतारका आणि सिनेतारे या खास सोहळ्यासाठी एकत्र जमले आहेत. त्यानिमित्तानं सलमान खानही येथे पोहचला आहे. तेव्हा त्याचा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी हा आयफियाचा सोहळा आबूधाबीला संपन्न होणार आहे. त्यानिमित्तानं प्रेस कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा हा व्हिडीओ कैद झाला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, विकी कौशल हा उभा आहे आणि तेवढ्यात समोरून सलमान खान येतो. सलमान खान येतानाच गर्दी वाढू लागते. परंतु तेवढ्यात सलमानचे लक्ष विकीकडे जाते. विकी त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो परंतु सलमान मात्र त्याला एग्नोर करतो. 

हेही वाचा - तो धावत आला अन् सलमानला मिठीच मारली, VIDEO नं जिंकली लाखोंची मनं

सलमानचा बॉडीगार्डही धक्का मारत सलमानला घेत पुढे जातो. यात असे दिसते की सलमाननं त्याला इग्नोर केलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. तो पुढे जात असतानाही विकी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो परंतु विकीशी मात्र तो काहीही न बोलता पुढे जातो. सध्या हा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होतो आहे. त्यामुळे नेटकरी मात्र हैराण झाले आहेत. 

Read More