Marathi News> मनोरंजन
Advertisement

Taimur Ali Khan ला आईस्क्रिम मिळवण्यासाठी का करावा लागला इतका संघर्ष? Video Viral

Taimur Ali Khan Ice Cream Video Viral : छोट्या नवाबवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Taimur Ali Khan ला आईस्क्रिम मिळवण्यासाठी का करावा लागला इतका संघर्ष? Video Viral

मुंबई : बॉलिवूड स्टार सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा लाडका तैमूर अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तैमूर अली खानसोबतच्या व्हिडिओमध्ये तुर्कीमधील आईस्क्रीम वाला मस्ती करताना दिसत आहे. तैमूर अली खान आईस्क्रीम घेण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत आहे. पण आइस्क्रीम विक्रेता तैमूरची मजा घेण्याची एकही संधी सोडत नाहीये.

व्हिडिओमध्ये, तैमूरने कधी तुर्की आईस्क्रीम विक्रेत्याने दिलेला रिकामा कोन पकडला आहे, तर कधी त्याला भरपूर आईस्क्रीम देऊन घाबरवलं आहे. तैमूर अली खान आईस्क्रीम वाल्याच्या मस्तीमुळे अस्वस्थ होऊन गोंडसपणे डोके हलवताना दिसत आहे.

आईस्क्रीम विक्रेता देखील छोट्या नवाबाची हसून हसून मजा घेत आहे. तैमूर अली खानचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नेटकऱ्यांनी छोट्या नवाबवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सैफ अली खान आणि करीना कपूरचा मुलगा तैमूरने चित्रपटांमध्ये दिसायला सुरुवात केली नसली तरी सोशल मीडियावर त्याचे फॅन फॉलोइंग खूप आहे. नेटिझन्स तैमूर अली खानचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर असतात.

 

 

 

 

Read More