Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनय क्षेत्रात सचिनच्या लेकीचं पदार्पण? शूटिंगमधील व्हिडीओ व्हायरल!

Sara Tendulkar Bollywood Debut : सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरच्या त्या व्हिडीओमुळे बॉलिवूड पदार्पणाची चर्चा

अभिनय क्षेत्रात सचिनच्या लेकीचं पदार्पण? शूटिंगमधील व्हिडीओ व्हायरल!

Sara Tendulkar Bollywood Debut : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर जितका लोकप्रिय आहे तितकीच लोकप्रिय त्याची लेक सारा तेंडुलरकर आहे. बॉलिवूडच्या स्टारकिड्सप्रमाणे सारा तेंडुलकर देखील तितकीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सारा तेंडुलकरचे लाखो चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकर ही नटून-थटून अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी पोहोचली होती. तिथला तिचा लूक पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले. त्यावेळी सारानं गुलाबी रंगाचा मिरर वर्कचा लेहेंगा परिधान केला होता. ज्यात ती खूप सुंदर दिसत होती. आता सारा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. पण यावेळी तिचा लूक नाही तर तिचं प्रोफेशन्ल लाइफ चर्चेत आहे. 

सारा तेंडुलकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याला पाहिल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडला आहे की सचिनची लेक अर्थात सारा तेंडुलकर ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे? तिचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमुळे साराच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा रंगली आहे. बुधवारी सारा तिच्या काही मित्रांसोबत मुंबईच्या पाली हिल परिसरात फिरताना दिसली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आता साराचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सारा स्टुडियोच्या बाहेर असलेल्या एका व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाताना दिसते. त्यामुळे सारा आता अभिनेत्री होण्याचा प्रयत्न करते की काय अशी चर्चा रंगली आहे. सारानं यावेळी निळ्या रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला आहे. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. 

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला टेली चक्करच्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला होता की सचिन तेंडुलकरची लाडकी लेक साराला अभिनय क्षेत्रात तिचं नशिब आजमवायचं आहे. सारा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी तिनं काही अभिनयाचे धडे देखील घेतले. 

हेही वाचा : 'माझ्यासोबत विश्वासघात झाला'; सोनाक्षीसोबत लग्न केल्यानंतर झहीर इक्बालला होतोय पश्चाताप! अभिनेत्याची कमेंट चर्चेत

एकीकडे साराच्या अभिनय क्षेत्रातील डेब्यूची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे सगळ्यांना साराच्या सोशल मीडिया पोस्टची प्रतीक्षा आहे. कारण तिच्या पोस्टवरून सत्य काय आहे हे स्पष्ट होईल. तर नेटकरी साराच्या या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'ती खरंच खूप सुंदर दिसते.' दुसरा नेटकरी म्हणाला की, 'अभिनेत्री नसली तरी देखील ती खूप सुंदर आहे.'

Read More