Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sara Tendulkar च्या Date Night चा फोटो व्हायरल, हात पकडणारी ती व्यक्ती कोण?

नुकतेच साराने काही डेट नाईटचे फोटो शेअर केले आहेत.

Sara Tendulkar च्या Date Night चा फोटो व्हायरल, हात पकडणारी ती व्यक्ती कोण?

मुंबई : मास्टर बास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील कामगिरीमुळे लोकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सचिन सध्या त्याच्या व्यावसायिक आयुष्यासह, बऱ्याचदा वैयक्तिक गोष्टींमुळे ही चर्चेत असतो. सध्या त्याची मुलगी सारा तेंडुलकर देखील तिच्या सुंदर लूकमुळे सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्षवेधून घेते.

सारा तेंडुलकरने नुकतेच लंडनमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे आणि अनेकदा सारा तेंडुलकर मुंबई ते लंडन असा प्रवास करताना दिसली आहे, या स्टारने आपल्या साध्या आणि मनमोहक व्यक्तिमत्त्वाने सोशल मीडियावर दहशत निर्माण केली आहे. तसेच सारा तेंडुलकरने शेअर केलेली प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

नुकतेच साराने काही डेट नाईटचे फोटो शेअर केले आहेत. नुकतीच रात्री सारा एका व्यक्तीसोबत डेटवर पोहोचल्याचं दिसून आलं. खुद्द साराने या रात्रीचा खास फोटो शेअर करत आपण डेटवर असल्याची माहिती दिली आहे.

खरंतर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात तिने लिहिले आहे की स्पेशल डेट नाईट! 

fallbacks

सारासोबत या फोटोत तिचा हात धरुन असणारी व्यक्ती बॉलिवूडची स्टार आहे. ही व्यक्ती आहे, बॉलीवूडची बेबी डॉल गायिका कनिका कपूर. कनिकाने देखील सारासोबतचा फोटो शेअर केला आहे. जो साराने आपल्या अकाऊंटवर रिपोस्ट केला आहे.

Read More