Marathi News> मनोरंजन
Advertisement

सचिन तेंडुलकरची लेक 'या' व्यक्तीच्या प्रेमात; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी तुझ्यावर खूप प्रेम करते...'

क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर आणि त्याची क्रिकेटची क्रेझ कोणीही विसरू शकत नाही. त्याची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.

सचिन तेंडुलकरची लेक 'या' व्यक्तीच्या प्रेमात; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी तुझ्यावर खूप प्रेम करते...'

मुंबई : क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर आणि त्याची क्रिकेटची क्रेझ कोणीही विसरू शकत नाही. त्याची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. पण या बाबतीत सचिनची मुलगी सारा तेंडुलकरही कमी नाही.

सारा तिच्या ड्रेसिंग सेन्स, फॅशनेबल लूक आणि लव्ह लाईफमुळे चर्चेत राहिली असली तरी, यावेळी सारा जरा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिच्या एका पोस्टमध्ये तिने त्या व्यक्तीबद्दल सांगितलं आहे ज्यावर ती सर्वात जास्त प्रेम करते. हे ऐकून तिचे वडील सचिनलाही आश्चर्य वाटू शकतं.

सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती दररोज तिच्या चाहत्यांसाठी पोस्ट आणि स्टोरी शेअर करत असते. ज्याला चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि प्रतिक्रिया मिळतात. सारा तिच्या अफेअर्समुळे खूप चर्चेत आहे. यावेळी साराने तिच्या एका पोस्टमध्ये ती ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करते त्याबद्दल सांगितलं आहे.

साराच्या अफेअरबद्दल बोलायचे झालं तर, टीम इंडियाचा युवा खेळाडू शुभमन गिलसोबत तिचं अफेअर सुरू आहे असं बोलंल जातं. दोघंही एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत असतात. मात्र, दोघांनीही याबाबत उघडपणे कधीही काहीही सांगितलेलं नाही.

पण आम्ही तुम्हाला सांगतो की, साराने  शुभमनबद्दल नाही तर तिच्या आईबद्दल पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ती तिच्या आई-वडिलांसोबत फोटोमध्ये दिसत आहे. पोस्टमध्ये साराने लिहिलं आहे की, घर तेच आहे जिथे माझी आई आहे. माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरं तर, आज सारा तेंडुलकरची आई अंजली तेंडुलकरचा 54 वा वाढदिवस होता. अशा परिस्थितीत साराने तिच्या आईला एक सुंदर चित्र आणि सुंदर संदेश देऊन शुभेच्छा दिल्या, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडते.

Read More