Marathi News> मनोरंजन
Advertisement

ना गाजावाजा, ना कसला दिखावा; 'गोपी बहू'च्या सिक्रेट लग्नाचे पहिले Photo Viral

'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू' म्हणून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी गुपचूप उरकलं लग्न? खास व्हिडीओ समोर येताच चर्चांना उधाण  

ना गाजावाजा, ना कसला दिखावा; 'गोपी बहू'च्या सिक्रेट लग्नाचे पहिले Photo Viral

Devoleena Bhattacharjee marriage : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या  लग्नाची चर्चा सुरु असताना साथ निभाना साथिया' (Saath Nibhaana Saathiya)  मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) ने मेहंदी, हळदीनंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पण यावेळेस अभिनेत्रीने खरंच लग्न केलं आहे की पुन्हा प्रँक करत आहे? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. 

देवोलीना लग्नाचे काही फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीवर नव्या नवरीच्या रुपातील फोटो शेअर करत अभिनेत्री चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. फोटो पाहून अभिनेत्री खरंच लग्नबंधनात अडकली असल्याच्या चर्चा रंगत आहेत. 

fallbacks

सध्या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. देवोलीनाच्या (Devoleena Bhattacharjee New Photos) नवीन फोटोंनी सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. कारण मेहंदी आणि गालावर  हळदी पाहून... चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee Haldi Ceremony Photos) चे हळदीचे फोटो सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहेत. एक व्हिडीओ आहे, ज्यामध्ये टीव्ही अभिनेता विशाल सिंग आणि देवोलीना दोघे सोबत दिसत आहे. एवढंच नाही,तर देवोलीनाने मेहंदीचा फोटो इन्स्टास्टोरीवर पोस्ट केला आहे. 

पण अभिनेत्रत्री लग्न नक्की झालंय? यावर अद्यापही चाहत्यांचा विश्वास नाही. याआधी देखील देवोलीनाने बॉयफ्रेंड विशाल सिंहसोबतच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला होता. तेव्हा देखील चाहत्यांना मोठा धक्का बसला. नंतर देवोलीना आणि विशालने त्यांच्या आगामी म्युझिक व्हिडिओसाठी हा सगळा प्रँक केल्याचे समोर आलं. 

Read More