Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ritesh Genelia : दिवाळीच्या मुहूर्तावर रितेश-जेनेलियाने दिली गुडन्यूज

आज दिवाळी पाडवाचे औचित्य साधून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलियाने गुडन्यूज दिली आहे.

Ritesh Genelia : दिवाळीच्या मुहूर्तावर रितेश-जेनेलियाने दिली गुडन्यूज

मुंबई : आज दिवाळी पाडवा चे औचित्य साधून. अभिनेता आणि आता दिग्दर्शनाची भूमिका साकारणारे रितेश देशमुख यांनी त्याच्या आगामी चित्रपट ' वेड ' च्या पोस्टर चे अनावरण केलं आहे. २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे  आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख करणार आहेत तसंच विशेष बाब म्हणजे  या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत .

 याआधी जेनेलियाने हिंदी ,तेलगू ,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे तसंच अभिनेत्री  जिया शंकर  या चित्रपटात भूमिका साकारत आहेत . आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा मुंबई फिल्म कंपनीने सोशल मीडियावर केली.

मराठी सिनेमा 'वेड' ची दिवाळी पाडवा मुहूर्तावर पहिली झलक आज जारी करण्यात आली आहे. हा सिनेमा 30 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर रितेशने सोशल मीडियावर या सिनेमाचं पोस्टर शेअर करत एक कॅप्शन दिलं आहे. हे कॅप्शन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहीलं आहे की, ''वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहिर करायला काय हरकत आहे! आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छां सकट सादर करतोय तारिख आणि चित्रपटाचा फर्स्ट लूक.आमचं #वेड तुमच्यापर्यंत येतंय ३० डिसेंबरला तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या.'' रितेश आणि जेनेलियाला मराठी सिनेमासात पाहण्यासाठी चाहत्यांसोबतच कलाकारही उत्सुक दिसत आहेत.

Read More