Marathi News> मनोरंजन
Advertisement

महाराजांच्या भूमिकेसाठी अजयची रितेशला पसंती

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक ऐतिहासिक चित्रपट साकारण्यात येतायत. 

महाराजांच्या भूमिकेसाठी अजयची रितेशला पसंती

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम स्टार अभिनेता अजय देवगन बोलतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बायोपिकसाठी अभिनेता रितेश देशमुख योग्य आहे. सध्या बॉलिवूडमध्ये अनेक ऐतिहासिक चित्रपट साकारण्यात येतायत. बॉलिवूड खिलाडी अभिनेता अजय देवगन 'तानाजी द अनसंग वॉरियर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्तयं. या ऐतिहासीक चित्रपटात तो वीर योद्धा तान्हाजी मालूसरे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बायोपिकमध्ये कोणाला पाहायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा क्षणाचाही विलंब न करता त्याने अभिनेता रितेश देशमुखचं नाव घेतलं आहे. यापूर्वी देखील रितेश महाराजांची भूमिका साकारली आहे. 

पण याबद्दल अजयने कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. तर आता चाहत्यांना रितेश महाराजांच्या भूमिकेत कधी अनुभवता येईल याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. रितेशने आतापर्यंत नायक, खलनायक, सहकलाकार अशा सर्वच भूमिका उत्तम प्रकारे बजावल्या आहेत. 

१० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होत आहे.  'तान्हाजी' हा अजय देवगनच्या करिअरमधील 100 वा सिनेमा आहे. अजय देवगनच्या तान्हाजी चित्रपटात अनेक मराठी कलाकार देखील आहेत. यामध्ये सुर्याजी मालुसरेची भूमिका देवदत्त नागेने तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकरने साकारली आहे. 

अजिंक्य देव हे देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. जीजामाता यांची भूमिका पद्मावती राव साकारत आहेत. हा सिनेमा १७ व्या शतकातील मराठा सरदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चांगले मित्र तान्हाजी मालुसरेंवर आधारित आहे. 

Read More