Marathi News> मनोरंजन
Advertisement

जेलमधून सुटल्यानंतर अभिनेत्री 2 वर्षांनी कामावर परतली, समोर आला फोटो

कामावर परतल्यानंतर तिला बरे वाटू लागले आहे.

 जेलमधून सुटल्यानंतर अभिनेत्री 2 वर्षांनी कामावर परतली, समोर आला फोटो

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आपल्या कामावर परतली आहे. याची माहिती खुद्द रियानेच सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आहे. प्रियकर सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ती दोन वर्षे कामापासून दूर होती, पण आता ती पुन्हा तिचे सामान्य जीवन जगत आहे आणि कामावर परतल्यानंतर तिला बरे वाटू लागले आहे.

रिया दोन वर्षांनी कामावर परतली

रिया चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून सतत मोटिव्हेशनल कोट्स शेअर करत होती.आता तिने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती खूप खुश दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये दिसत आहे.

तिने कॅप्शनमध्ये लिहिले- 'काल मी 2 वर्षांनंतर कामावर गेले आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात ज्यांनी मला साथ दिली त्यांचे आभार.

काहीही असो, सूर्य नेहमीच चमकतो. कधीही हार मानू नका'. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूतचे निधन झालं. 

रिया चक्रवतीची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. ड्रग्ज प्रकरणी तिला अटक देखील करण्यात आली होती.

 

सुशांतसाठी लिहिलेली भावनिक पोस्ट

सुशांत सिंग राजपूतच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीने एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली होती.

सुशांतसोबतचा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आतापर्यंत असा एकही क्षण गेला नाही, जेव्हा मला वाटले की तू इथे नाहीस. असे म्हणतात की वेळ सर्व काही बरे करते, पण तू माझा वेळ आणि सर्व काही होतास.

fallbacks

मला माहित आहे की आता तू माझा संरक्षक देवदूत आहेस आणि तू चंद्रावरुन तुझ्या दुर्बिणीद्वारे माझे रक्षण करत आहेस. मी रोज तुझी येण्याची वाट पाहते..."

Read More