Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रजासत्ताक दिन २०१९: देशभक्तीची ही गाणी तुमच्यात नवा उत्साह आणतात

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात होतं कार्यक्रमांचं आयोजन

प्रजासत्ताक दिन २०१९: देशभक्तीची ही गाणी तुमच्यात नवा उत्साह आणतात

मुंबई : २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नवी दिल्लीत भव्य परेड पाहायला मिळते. संपूर्ण जगाला भारत आपली ताकद दाखवतो. देशभरात देखील अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आपली देशभक्ती लोकं वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. अनेकांना देशभक्तीची गाणे ऐकण्याचं मन या दिवशी होतं. अनेक ठिकाणी ही गाणी वाजत असतात. जी आपल्य़ा कानावर पडताच आपली छाती अभिमानाने फुगते. बॉलिवूडची अशी अनेक गाणी आहेत. जी आपल्यात उत्साह भरतात. प्रजासत्ताक दिन आहे राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला भारतात विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी भारत पूर्णपणे स्वातंत्र झाला होता. या दिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला काही अशी गाणी सांगणार आहोत जी ऐकूण तुमचं मन भरुन येईल.

रंग दे बसंती चोला... 'शहीद भगत सिंह' सिनेमातील हे गाणं आहे.

संदेशे आते हैं...  हे गाणं देशाच्या सीमेवर असणाऱ्या सैनिकांची आठवण करुन देते.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं अनेकांच्या डोळ्यात अश्रृ आणते.

ये देश है वीर जवानों का...हे गाणं भारतातील वीर पुरुषांची आठवण करुन देते.

आओ बच्चों तुम्हें दिखाएं.... हे गाणं आपली देशाबद्दलची भावना जागृत करते.

कंधो से मिलते हैं कंधे...हे गाणं तुमच्यात नवा उत्साह आणतो

नुकताच रिलीज झालेल्य़ा 'राजी' सिनेमाचं हे गाणं खूपच प्रसिद्ध झालं होतं.

सध्या देशभरात चर्चेत असलेल्या 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' सिनेमातील हे गाणं तुमच्य़ामध्ये नवा उत्साह भरणारं आहे.

Read More