Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : '३ स्टोरीज'मधल्या रेणुकाचा लूक चर्चेत

'हम आपके है कौन'मध्ये सलमानच्या वहिणीच्या भूमिकेत दिसलेली रेणुका शहाणे आता पुन्हा एकदा '३ स्टोरीज' या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

VIDEO : '३ स्टोरीज'मधल्या रेणुकाचा लूक चर्चेत

मुंबई : 'हम आपके है कौन'मध्ये सलमानच्या वहिणीच्या भूमिकेत दिसलेली रेणुका शहाणे आता पुन्हा एकदा '३ स्टोरीज' या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

'३ स्टोरीज' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. त्यानंतर रेणुकाचा या सिनेमातील लूक चर्चेत आलाय.

'हम आपके है कौन' या सिनेमातील माधुरी दीक्षितची बहिण आणि सलमानची वहिणी म्हणून दिसलेल्या रेणुकानं प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळवलं होतं. रेणुकाचा तो साधा लूक लोकांचा आजही लक्षात आहे. त्यानंतर आता पुन्हा तब्बल १४ वर्षानंतर रेणुका हिंदी सिनेमातून मोठ्या पडद्यावर येतेय.

रेणुकाच्या म्हणण्यानुसार, आता तिची मुलं मोठी होत आहेत. त्यामुळे आता ती तीचं लक्ष सिनेमांवर केंद्रीत करू शकते. '३ स्टोरीज'चं कथानक दमदार असल्यामुळेच आपण या सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतल्याचंही रेणुकानं म्हटलंय. 

 

Read More